प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा पंचक्रोशीत गणेशाचे उत्साहात विसर्जन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा :  ‘गणपती बाप्पा मोरया,  पुढच्या वर्षी लवकर या ‘ च्या गजरात तालुक्यातील गगनबावडा,  सांगशी,  सैतवडे,नरवेली, कातळी , लखमापूर पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी पाच दिवसाच्या घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन उत्साहात, शांततेत पार पडले.
गणेशाला बुद्धी व ज्ञानाचा अधिपती मानले जाते. गणरायाच्या आगमनाने घरातील दुःखे कमी  होतात. धन, सुख, समृद्धी येते. देशात सगळीकडे गणेश चतुर्थी साजरी केली  जाते, पण महाराष्ट्रात विशेषतः कोकणात मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी उत्सव मानला जातो.
बालचमू डोक्यास पट्ट्या बांधून घोषणा देत गुलालाची उधळण करत होते. तर तरुणी नवनवीन, रंगीबेरंगी साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या.मिरवणुकीमध्ये  तरुणाईसह ज्येष्ठांचाही उत्साह वाखाणण्या सारखा होता.  सर्वांनी गणेश आरत्या, फुगडया गाण्यांच्या गीताने आणि  ‘निरोप देतो देवा आता आज्ञा असावी’, चुकले आमचे काही तर क्षमा असावी’. ….. अशा ओळी पुटपुटत  गणरायाला  निरोप दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.