प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रॉयल फाईट क्लबचे घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : उत्तर प्रदेश (कानपुर) येथे झालेल्या ३ ऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर व कॅडेट तायक्वांदो स्पर्धा आणि ज्युनियर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन फायनल ऑल इंडिया स्पर्धा, इंडिया तायक्वांदो यांच्या वातीने भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी दिल्ली, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र संघाने या वर्षीही पहिले स्थान पटकावले व महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले. या स्पर्धेत रॉयल फाईट क्लब मिरजेचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धत २ रोप्य व १ कांस्य पदक पटकावले आहे. या विजयामुळे मिरज व सांगली शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. अनन्या चौगुले २० किलो वजनी गटात रोप्य पदक, वल्लभ जोशी १४८ सेमी उंची गटात रोप्य पदक, अब्बूबक्कर शेख ७३ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. तर स्वरा सातपुते , रोनीत साळुंखे यांनी सहभाग नोंदवला होता. या सर्व खेळाडूंचे रेल्वे स्टेशन वर स्वागत करण्यात आले. या सर्वांना प्रशिक्षक स्टीवन काकी आणि स्टीफन काकी याचे मार्गदर्शन लाभले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.