प्रतिष्ठा न्यूज

डेरला जिल्हा परिषदेच्या शाळेत “निपुण भारत” आनंददायी शिक्षण उत्सव साजरा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील डेरला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दि.19 आॕक्टोंबर रोजी  मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या “निपुन भारत’ या अभियानातंर्गत  इयत्ता पहिली ते तिसरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या माता- पालकांचा कृतीयुक्त आनंददायी शिक्षण माहिती उत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
या उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी “निपुन भारत” लातूर विभाग प्रमुख- गोविंद पौळ तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे साधन व्यक्ती- बालाजी कातूरे हे होते. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना गोविंद पौळ म्हणाले की “निपुन भारत” घडविण्याची कार्य पध्दती त्यासाठी तयार करण्यात आलेली शैक्षणिक व्हिडिओ, साहित्याचा वापर, पालकाची भूमिका, शिक्षकाची कामे सांगितले. आनंददायी शिक्षण व कृतीयुक्त शिक्षण निश्चितच भविष्य घडविल असे ते म्हणाले यावेळी उपस्थित माता पालक महिलांना कृतीयुक्त आनंददायी खेळाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच केंद्रप्रमुख- व्यंकटेश केंद्रे यांनी जागृत माता पालकाच्या प्रेरणेतून पाल्याची चांगली जडणघडण होते .त्यासाठी माता पालकांनी पाल्याच्या भविष्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक- पंडित पवळे यांनी आपल्या प्रास्तविकात शाळेच्या प्रगतीचा आलेख सांगून विविध शैक्षणिक उपक्रमातून शाळेची गुणवत्ता वाढल्याचे सांगितले. इयत्ता पहिली वर्गाच्या शिक्षिकेच्या मेहनतीतून शंभर टक्के मुले जोड अक्षरासह चांगले पुस्तक वाचन व सोप्या गणिती क्रिया करतात असे सांगितले. या “निपुण भारत” उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील- अंजली भंडे, दिपाली सनपूरकर, सारीका बोधनकर या शिक्षिकांनी  परिश्रम घेतले.तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  पदविधर शिक्षक- उत्तम क्षीरसागर यांनी तर आभार- अंजली भंडे यांनी मानले. यावेळी शाळेच्या मैदानावर  रांगोळ्याची सजावट करण्यात आली होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.