प्रतिष्ठा न्यूज

१९ व्या राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ जाहीर…

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली : १९ वी राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धा दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार पटेल स्पोर्टस् सिटी, गुजरात विद्यापीठ नवरंगापुरा, अहमदाबाद, गुजरात येथे होणार आहेत.  सदर राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धा १४ व १६ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात घेण्यात येणार आहेत. जिल्हा संघाची निवड,  निवड समिती सदस्य मिलिंद खिलारे, उत्तम मोटे, मिलिंद कुलकर्णी, युवराज खटके यांनी केली आहे.
       राज्य  स्पर्धेकरिता सदर संघ निवड झालेल्या खेळाडूंनी जन्म तारखेचा दाखला व दहावी बोर्ड प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे. पत्रव्यवहार व अधिक माहितीसाठी संजय पाटील सचिव सांगली जिल्हा  अमॅच्यूअर ॲथलेटिक्स असोसिएशन सांगली मोबाईल क्र. ९७६७५९५०५९ , प्रा. डॉ. गणेश सिंहासने मोबाईल क्र ९४२३२६८८३७,  विजयकुमार शिंदे ९६०४४०३४३४ यांच्याकडे संपर्क करावा असे संघटनेचे अध्यक्ष  गौतम पाटील यांनी जाहीर केले आहे. सदर संघ दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मिरज रेल्वे स्टेशन येथून रवाना होणार आहे. या संघाचे संघ व्यवस्थापक कृष्णांत पाटील मोबाईल क्र ९७६५६३१४७७ प्रशिक्षक विजयकुमार शिंदे मोबाईल क्र ९४२३२७१९३४ यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे आहेत. १४ वर्षाखालील मुले- अभिनव शिंदे, नितेश शेटे  १४ वर्षाखालील मुली-  वर्षा माने, १६ वर्षाखालील मुले ऋग्वेद आंबे, अथर्व उगळे, यश जाधव, नील पवार, पैज अरभावी, विश्वजीत साळुंखे, १६ वर्षाखालील मुली- हर्षदा भोसले, सिद्धी शिर्के
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.