प्रतिष्ठा न्यूज

विलिंग्डन महाविद्यालयातील वसुधा माळी खेळत असलेल्या शिवाजी विद्यापीठ संघाला रग्बी स्पर्धेमध्ये रोप्य पदक

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली : अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धा चंदिगड विद्यापीठ चंदिगड पंजाब या ठिकाणी संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये विलिंग्डन महाविद्यालयातील विद्यार्थिनी वसुधा माळी बी.एस.सी. भाग १ हिची शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाली होती. तिच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे संघास रौप्य पदक प्राप्त झाले. त्याबद्दलबद्दल तिचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्रसंगी जिमखाना कमिटी चेअरमन डॉ.राजू कांगणे, डॉ.मनोहर कोरे, डॉ.एन.टी.पडाळ प्रा.  अमर माने इत्यादी उपस्थित होते. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे, सदस्य  रवींद्र ब्रम्हाळकर, आजीव सदस्य डॉ.आर.ए.कुलकर्णी ,  आर.जे.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गणेश सिंहासने, क्रीडा शिक्षक योगिता परमने, किशोर चंदुरे, अशोक आंबोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.