प्रतिष्ठा न्यूज

भारत गृह निर्माण सोसायटी कुपवाड येथील प्लॉट धारकांना त्यांच्या मिळकती कायदेशीर होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू – गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : ज्या प्लॉट धरकांनी या सोसायटी मध्ये या सोसायटीचे मुख्य प्रवर्तक कै कापसे यांच्या कडून अधिकृत दुय्यम निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरुन दस्त ऐवज केले आहेत. अशा दस्त ऐवजाची संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन सर्टिफाय कॉपी सही शिक्यांनीशी घ्यावी.मात्र त्यांच्या नोंदी सातबारा पत्रकी झाल्या नाहीत अशा नागरिकांनी आपले दस्त ऐवज कुपवाड तलाठी कार्यालयात जाऊन नोंदीसाठी प्रस्ताव द्यावेत. महसूल कायद्या अन्वये संबंधित तलाठी यांना नोंदी घालणे बंधनकारक आहे. शिवाय यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही.शिवसेना गुंठेवारी विकास समिती अशा नागरिकांना न्याय मिळवून देइल ..

या सोसायटीत शेख नावाच्या व्यक्तीने स्वतः सोसायटीचे चेअरमन म्हणून स्वयंघोषित लेटर पॅड व शिक्के बनवून अनेकाना प्लॉट विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.२००९ रोजी या सोसायटीवर अवसायक असताना हा चेअरमन झालाच कसा असा संशोधनाचा विषय आहे. त्यांना अधिकार कुणी दिले? याचे रेकॉर्ड मिरज उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे शेख नावाच्या वक्ती कडून ज्या नागरिकांनी प्लॉट घेतले आहेत त्यांना पॅजेशन कायद्या अन्वये, लाईट बिल, घर पट्टी, नळ पट्टी. व बारा वर्षा हुन अधीक काळ संबंधित जागेच कब्जा असलेला पुराव्याची खात्री करून शिवसेना गुंठेवारी विकास समिती सर्वोतोपरी न्याय मिळवून देइल.

कुपवाड शहरांत एकूण साडे आठशे गृह निर्माण सोसायट्या असून बाधित नागरिकांना न्याय मिळवून देऊ.या भारत गृह निर्माण सोसायटी मध्ये एकूण १६ सर्व्हे नंबर असून २५ वर्षांपासून प्लॉट विक्री झालेली आहे. मात्र या सोसायटी मध्ये ज्या नागरिकांनी प्लॉट घेतले आहेत मात्र त्यांना प्लॉट मिळून येत नाहीत अशा नागरिकांनी थेट उपनिबंधक कार्यालय मिरज येथे जाऊन या सोसायटीचे शासकीय अवसायक श्री सूर्यवंशी यांना भेटून आपले प्लॉट मिळवून देणे बाबत लेखी पत्रे द्यावीत त्या अर्जास रु ५ चे तिकीट लावून पोहोच घ्यावी.

कुपवाड शहर शिवसेना प्रमुख श्री सुरेश साखळकर यांचेशी संपर्क साधावा.. कोणाच्या तक्रारी असतील अडचणी असतील त्यांनी लेखी स्वरूपात आपल्या प्लॉट च्या सर्व अधिकृत कागदपत्रा सह द्याव्यात असे आव्हाहन करनेत येत आहे.

गुंठेवारी चळवळीचे जनक,
*चंदनदादा चव्हाण, प्रदेशाध्यक्ष : शिवसेना गुंठेवारी विकास समिती, महाराष्ट्र राज्य*. Mo :9421245003

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.