प्रतिष्ठा न्यूज

निमणी येथे ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालवता यावा,समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे,शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता,कामाचा हक्क,शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी शासकीय निर्णयातील तरतुदीनुसार एक ऑक्टोबर हा दिवस जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येतोय.त्यानुसार आज निमणी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ आयोजित केला होता.स्वागत व प्रास्ताविक प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले. यावेळी सरपंच सौ.रेखा रविंद्र पाटील, उपसरपंच राजेंद्र घोडके व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते उपस्थित जेष्ठ नागरिकांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोक सूर्यवंशी,आर.डी. पाटील,तुकाराम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी बोलताना सरपंच सौ.रेखा पाटील म्हणाल्या घरातील ज्येष्ठांना जपणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांना योग्य आहार,विहार देणे आवश्यक आहे.त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा उपयोग पुढच्या पिढीने करून घेणे आवश्यक आहे.
यावेळी सर्वश्री जगन्नाथ बापू मस्के, बबनकाका पाटील,विलासराव पाटील,श्रीपती शेळके,आनंदा कृष्णा पाटील भगवान शिंदे,चंद्रकांत कदम, आप्पासाहेब पाटील,जगोंडा पाटील, दादासाहेब पाटील,रामचंद्र शेलार,आनंदा आडके,शिवाजी घोडके,श्रीरंग पाटील,शिवाजी सोमदे , बाळासाहेब गुरव,गोविंद शिंदे, गणपती गुरव,रघुनाथ शिंदे,गजानन पाटील,मारुती पाटील,आण्णासो पाटील,माणिकराव पाटील,रघुनाथ माने,श्रीमती गंगुबाई पाटील,अक्काताई पाटील,लीलावती गुरव,सौ.लिलादेवी पाटील यांच्यासह उपस्थित जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील,नामदेव जमदाडे, पोलीस पाटील सतीश पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, मुख्याध्यापक पी.डी.गुरव,ग्रामसेवक किरण जाधव,आण्णासाहेब चौगुले, मेजर यशवंत दुधारकर,दिलीप पाटील,महादेव पाटील, नवनाथ पाटील,उदय पाटील,अक्षय घाळी,निखिल गायकवाड,श्रीमती सुशीला पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.