प्रतिष्ठा न्यूज

मिरजेतील प्रकरणांमध्ये पडळकर बंधूवर दरोडेखोरीचा गुन्हा नोंद करा : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्राचा बिहार करू पाहणाऱ्या व त्यांना साथ देणाऱ्या राज्य सरकारच्या निषेध करण्यासाठी मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वृंदावन हॉटेलच्या समोरील जवळजवळ दीड एकर जागेवरती असणाऱ्या गोरगरीब झोपडपट्टी व त्या ठिकाणी पक्की घरे करून राहणाऱ्या व दुकानदार यांच्या घरावर, दुकानावरती विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर व त्याच्या कार्यकर्त्याने मिरजेतील त्या ठिकाणचे नागरिक साखर झोपेत असताना अपरात्री त्यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू, व स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन संसार चालवणाऱ्या गोरगरीब नागरिकावरती ब्रह्मानंद पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोकलेन मशीन व हत्यारे घेऊन हल्ला केला त्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले व त्यांना दरोडेखोराप्रमाणे वागणूक देऊन त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू लुटून त्यांचे घरे उध्वस्त केली ही बातमी आम्हाला समजल्यावर आज मराठा स्वराज्य संघाचे, दरारा या. सामाजिक संघटनेचे,व मिरज बचाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी त्या भागातील नागरिकांची विचारपूस चौकशी केली असता त्यांनी आम्हाला दबलेल्या आवाजात सांगितले की आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये राहतो असा प्रश्न विचारला कारण रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये लहान मुले, वयोवृद्ध, आजारी पेशंट, गर्भवती महिला, घरात असताना रात्री दोन वाजता आम्हा सर्वांना बाहेर काढून आमची घरी पाडली हे राक्षसी वृत्तीचे लोकच करू शकतात असे त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आले यावर मी त्या नागरिकांची विचारपूस करून माहिती घेतली तर त्या मिरज प्रशासकीय, शासकीय अधिकारी मिरज शहर पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार, प्रांत ,कलेक्टर ,एस पी हे आमच्या विरोधात असून ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत असे ते आमच्याशी वर्तन करत आहेत व त्या लोका वरती अन्याय करू लागले आहेत जर रक्षकच भक्षक झाले तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण रात्री फक्त दरोडेखोरच असे कृत्य करू शकतात व तेही पोलिसासोबत हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा घोरअपमान आहे असे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी त्या ठिकाणी आपले विचार मांडले .असे कृत्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर त्याचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यावर दरोडेखोरचे गुन्हे दाखल करावे अशी माहिती राज्य प्रवक्ता माननीय संतोष पाटील येणे पत्रकारांना दिले या वेळेला मिरजेतील अन्यायग्रस्त, पीडित नागरिक व अनेक पदाधिकारी उपस्थित होते या वेळेला मिरज बचाव कृती समितीचे अध्यक्ष माननीय प्रमोद इनामदार ,सत्वशील पाटील, श्रीकांत कोळीगीरी, स्वप्नील शेटे, अनमोल पाटील, सुशांत कदम, त्या भागातील अनेक नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.