प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा पर्यटन दृष्ट्या मागासच पर्यटन हबची प्रतीक्षाच, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, विकासाची उपेक्षाच

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.१३ : कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटरवर असलेले निसर्गरम्य दोन घाट असलेले कोकणचे प्रवेशद्वार म्हणून गगनबावडा तालुक्याची ओळख ,या तालुक्याला ऐतिहासिक, व आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. बारमाही हिरव्यागार पाना फुलांनी नटलेला, निसर्गरम्य परिसर, पर्यटन स्थळे असूनही राजकीय इच्छाशक्ती व शासनाचे वेळकाढू धोरण, अभ्यासू वृत्तीचा अभाव इत्यादी अडचणींमुळे पर्यटन दृष्ट्या तालुका मागासच राहिला आहे.
गगनबावडा म्हणजे पूर्वीची करवंदवाडी.१८५७ च्या गडकऱ्यांच्या बंडात इंग्रजांनी उठाव मोडून तोफांचा भडिमार करून नासधूस केली. पर्यटन दृष्ट्या प्रचंड गुणवत्ता असलेल्या तालुक्याचा विकास मात्र झाला नाही त्याकरता ग्रामस्थांच्या हातात पर्यटनाचे नियोजन देण्याची गरज आहे. तिलारी नगरमध्ये ज्या पद्धतीने पर्यटनात लोकसहभाग वाढवला, त्याप्रमाणे इतरत्रही पर्यटन विकासात लोकसहभाग असणे गरजेचे आहे. त्यातून पर्यटन विकासातून होणाऱ्या रोजगार निर्मितीचा फायदा सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचू शकतो. गाईड, रिक्षाचालक त्यांचे प्रशिक्षण आदि बारीक गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

*पिकते तेथे विकत नाही *

कोकणात प्रवेश करण्यासाठी दोन घाट आहेत घनदाट जंगले आहेत या भागात महाराष्ट्रात उच्चांकी पाऊस पडतो तरी अजूनही पर्यटन विश्वाची मोहर लागलेली नाही.गगनबावडा सारखे ठिकाण देशात अन्यत्र असते तर त्याचे मोठे मार्केटिंग झाले असते.

* गगनबावड्यातील आकर्षण*
* गगनगड, सांगशी येथील प्राचीन शिलालेख
* पळसंबेचे एक पाषाणी,पांडवकालीन प्राचीन मंदिर
*पंतअमात्य जहागीरदार यांचा वाडा
*कुंभी,कोदे, वेसरफ, अणदूर निसर्गरम्य तलाव
*बोरबेट येथील मोरजाई पठार,
* कोकणचे प्रवेशद्वार करूळ व भुईबावडा घाट
* संपन्न जैव विविधता

” गगनगडाचे अध्यात्मिक महत्त्व सातासमुद्रापार गेलेले आहे. प्रति महाबळेश्वर म्हणून गगनबावड्याला ओळखले जाते. पर्यटन विकास बाबत शासन गंभीरपणे घेत नाही तोपर्यंत पर्यटन विकास होणार नाही.
* नंदकुमार पोवार, माजी सरपंच

 

” गगनबावडा तालुका कलामंच ने सहा वर्षांपूर्वी शासनाची वाट न पाहता स्व कल्पनेतून आराखडा तयार करून पाठवला. पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतील. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही यामध्ये विठ्ठलाई मंदिर ते गगनबावडा रोपवे, कुंभी वेसरफ जलाशयात ‘स्कुबा ड्रायविंग’, पंत अमात्य यांची समाधी,मोरजाई पठारावर पवनक्की. व शिवस्मारक याबाबत आराखडा पाठविला होता.मात्र शासनाने दुर्लक्षच केले आहे.”
* विनोद प्रभुलकर, गगनबावडा तालुका कला मंच

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.