प्रतिष्ठा न्यूज

तासगावात मुस्लिम समाजातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव शहरात मुस्लिम समाज आणि आझाद कला क्रीडा व सांस्कृतिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.यावेळी प्रास्ताविक करताना जाफरभाई म्हणाले कि समाजातील प्रत्येक घटकाला ताट मानेने जगण्याचा संविधानिक अधिकार डॉ बाबासाहेब यांच्या मुळेच प्राप्त झाला, समाज आणि समाज व्यवस्था याला कायदेशीर रुप देणेच महान कार्य बाबासाहेबांच्या लेखणीतून घडलेले आहे. तसेच सातत्याने बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आझाद कलाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय ग्राहक संरक्षण मंचचे विभागीय सहसंघटक हाजी आलमशा शेकडे म्हणाले कि भारतासारख्या खंडप्राय देशात प्रत्येक जातीधर्माचे लोक विविध प्रांतीय भाषा बोलणारे लोक आज गुण्यागोविंदाने एकत्र राहतात एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान करतात आणि हे जे घडले आहे ते केवळ डॉ बाबासाहेब आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानातील अधिकारामुळे जवळपास ३५ हजार पुस्तकांचे दिवसरात्र अध्ययन करुन देशातील सर्व जातीधर्माच्या अठरापगड लोकांना भविष्यात अतिशय सन्मानाने जगता यावे याकरिता सर्व समावेशक असे संविधान लिहिले गेले.यावेळी ते म्हणाले या जगात कायद्यापेक्षा कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ नाही कायदा हा सर्वांसाठी समान असतो डॉ बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान नसते तर आपलं जगणं हि शेळ्या मेंढ्या सारखं झालं असतं आज आम्ही भाग्यवान आहोत कि संविधानातील अधिकारामुळे आम्ही ताठ मानेने जगत आहोत.यावेळी समाजातील जेष्ठ नागरिक आदरणीय हाजी यासिन भाई मोमीन,हाजी सरदार भाई जमादार,दगडुशेठ जमादार,इम्तियाज गवंडी,सलामभाई परवेज गवंडी,शोहेब मुजावर,निहाल जमादार यांच्या सह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.शेवटी आभार सिराज भाई तांबोळी यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.