प्रतिष्ठा न्यूज

खेळाडूंसाठी शिवाजी विद्यापीठ सदैव खुले राहील डॉक्टर शरद बनसोडे

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : विलिंग्डन महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर शरद बनसोडे संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना डॉ.बनसोडे यांनी विद्यापीठातील विविध खेळांमध्ये आपल्या विद्यापीठाचा परफॉर्मन्स त्याच बरोबर खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने जर खेळ केला तर तो अतिउच्च पदापर्यंत पोहोचू शकतो त्याची बरीच उदाहरणे त्यांनी दिली विद्यापीठामार्फत महाविद्यालयास खेळा संदर्भात जी काही मदत लागेल ती देण्याचे त्यांनी आश्वासन दिले खेलो इंडियासारखा प्रकल्प आपण आपल्या महाविद्यालयाच्या मैदानावरती राबवावा त्यासाठी जी मदत लागेल ती करण्याची त्यांनी आश्वासन दिले या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षपदी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे हे होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाडूंनी त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला देखील तितकेच महत्त्व द्यावे कारण रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज एक तास मैदानावरती व्यायाम करणे गरजेचे आहे असे आवाहन डॉक्टर विश्राम लोमटे यांनी केले महाविद्यालयामध्ये वर्षभरामध्ये अखिल भारतीय अंतर विद्यापीठ ,पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पदक मिळवलेल्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील खेळाडूंचा सन्मान करण्यात आला .वार्षिक क्रीडा स्पर्धामध्ये क्रमांक मिळविलेल्या संघांनाट्रॉफी देणेत आली विशेष म्हणजे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची क्रिकेट मॅच मधील विजेता संघ शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देखील पाहुण्यांच्या हस्ते कायम फिरता चषक देणेत आला याप्रसंगी सांगली विभागीय सदस्य रामकृष्ण पटवर्धन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर ताम्हणकर आजीव सदस्य आर. जे. पाटील उपप्राचार्य व अजीव सदस्य डॉक्टर आर. ए. कुलकर्णी उपप्राचार्य डॉक्टर सुरेश कुंभार जिमखाना समिती प्रमुख डॉक्टर राजू कांगणे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर गणेश सिंहासने कनिष्ठ विभागच्या क्रीडा शिक्षिका योगिता परमणे श्री अशोक आंबोळे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.