प्रतिष्ठा न्यूज

फुलमळा तांडा- जिल्हा परिषद शाळेत- संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील फुलमळा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत सेवालाल महाराज यांची जयंती दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य- सतीश राठोड, मुख्याध्यापक- कनशेट्टे, शिक्षक- ढाले व उपस्थितीतांनी केले.
यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती देतांना ग्रामपंचायत सदस्य- सतीश राठोड म्हणाले की, संत सेवालाल महाराज गोर समाजाचे केवळ संत नव्हते तर ते क्रांतीकारी शूर योद्धा होते. तसेच ते धुरंदर समाजकारणी होते. ते अंधश्रद्धा मानत नव्हते ते श्रधाळू होते. श्रीमंत गरीब असा भेदाभेद न करता त्यांनी धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक या कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच ते स्त्री समानता, क्रांतीकारी व मानवतावादी विचाराचे होते.असे राठोड म्हणाले.
शाळेचे मुख्याध्यापक- कनशेट्टे, शिक्षक- बालाजी ढाले, अंगणवाडी कार्यकर्ती- आम्रपाली जोगदंड,  शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा- मिरा राठोड,  सावित्रीबाई राठोड, व विध्यार्थी उपस्थितीत होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.