प्रतिष्ठा न्यूज

रेव्याचीवाडीत शिवलिंग प्रतिष्ठापना सोहळा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावड : रेव्याची वाडी( सैतवडे ) ता. गगनबावडा येथे आज शिवलिंग प्रतिष्ठापना सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
कालपासून गाव प्रदक्षिणा व मिरवणूकीने या सोहळ्याला प्रारंभ झाला. आज मुख्य दिवशी तर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. आज सकाळी साडेसहा वाजता पुरोहित यशवंत पाध्ये यांचे हस्ते सर्व धार्मिक विधी, तर अकरा वाजता प.पू.उंबरनाथ महाराज यांचे हस्ते शिवलिंग प्रतिष्ठापना करण्यात आली. महाअभिषेक झाल्यानंतर साडेअकरा वाजता महाआरती व मंत्र पुष्पांजली झाली. बारा वाजता साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग पडवळ यांच्या हस्ते हॉलचे उद्घाटन झाले. सव्वा बारा वाजता हळदीकुंकू व माहेरवाशीणांची ओटी भरणी कार्यक्रम झाला. दुपारी लखमापूर, बुवाची वाडी येथील भजनी मंडळांची भजने झाली. पाच वाजता सद्गुरु रामचंद्र कदम महाराज यांचे शिष्यांचे भजन, तर रात्री आठ वाजता ह. भ. प. वास्कर महाराज यांचे अधिपत्याखाली ह. भ. प.रामचंद्र पारगावकर यांचे मार्गदर्शनाखाली कीर्तनकार ह.भ.प. उत्तम पाटील महाराज (मिरज) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सर्व व्यवस्था शंभू महादेव व्यवस्थापन कमिटी, रेव्याचीवाडी यांनी उत्तमरीत्या पार पाडली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.