प्रतिष्ठा न्यूज

नरेंद्र दाभोलकरांची बारा पुस्तके आता ब्रेल लिपीत ; दृष्टीहीनांच्या विचारांना डोळस बनवणारा उपक्रम – शनिवारी आळंदी येथे प्रकाशन सोहळा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दृष्टीहिन व्यक्तींपर्यंत विवेकी विचार पोहचावे व त्यांनी आत्मविश्वासाने आयुष्य जगावे या उद्देशाने लायन उषा येवले यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मौलिक साहित्य ब्रेल लिपीत आणले आहे. डॉ.दाभोलकरांच्या १२ ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन डॉ. हमीद दाभोलकर यांचे हस्ते आणि लायन मीनांजली मोहिते यांच्या उपस्थितीत आळंदी पुणे येथील एन.बी.एफ.एम या अंधशाळेत
शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. सदर प्रकाशन सोहळा संपन्न होईल. यावेळी १० दृष्टीहिन व्यक्तींच्या संस्थांना १२ पुस्तकांचा संच मान्यवरांचे हस्ते सुपूर्त करण्यात येईल.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तिका ब्रेल लिपीत आल्यामुळे दृष्टीहिन व्यक्तींच्या पर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, चमत्कार सादरीकरण, स्रिया आणि अंधश्रद्धा, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, फलज्योतिष, श्रध्दा अंधश्रद्धा, उत्क्रांतीवाद, धर्मनिरपेक्षता असे विषय पोहोचतील.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सर्व साहित्य हिंदी मध्ये यापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. आता हे साहित्य ब्रेल लिपीत येत असल्यामुळे समाजातील दृष्टीहिन समुदायाला याचा मोठा फायदा होणार आहे.

दृष्टीहिन व्यक्तींच्या विचारांना डोळस बनवणारा हा उपक्रम आहे. दृष्टीहीन बांधवांसाठी असे वैचारिक विज्ञानवादी, पुरोगामी साहित्य ब्रेल लिपीत उपलब्ध नसते. ही उणीव लक्षात घेऊन अंनिसच्या हितचिंतक लायन उषा येवले आणि त्यांचे पती अशोक येवले (निगडी पुणे) यांच्या आर्थिक सहकार्यातून, तसेच जागृती अंधशाळेच्या ब्रेल छापखान्याचे गजानन मगर, अंनिसचे राहुल थोरात, मिलिंद देशमुख, जागृती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका मंगला वानखेडे , एन.बी.एफ.एम उपाध्यक्ष सिध्दू बिराजदार यांच्या सहकार्याने ही पुरोगामी विचारांची पुस्तके ब्रेल लिपीत येत आहेत. याचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.