प्रतिष्ठा न्यूज

सावळजमध्ये दुरसंचार ऑफिसला मोठी आग

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : सावळज ता.तासगाव येथील सावळसिध्द विकास सोसायटीच्या जागेत असलेल्या बी एस एन एल  (दूरसंचार) ऑफिसला रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली. या आगीत दुरसंचार विभागाच्या मशिन व केबल्स जळून खाक झाल्या. ग्रामस्थांनी आग विझवत होणारे मोठे नुकसान टाळले.आगीचे कारण कळू  शकले नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सावळसिध्द विकास सोसायटीने दूर संचार विभागाला जागा भाड्याने दिलेली आहे. यामध्ये दूरसंचार विभागाच्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक मशीनरी व मोबाईल टॉवर आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजता अचानक ऑफिस मधून धुराचा व ज्वालाचा लोट येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी याची  कल्पना आल्यावर सोसायटी पदाधिकारी व दूरसंचार विभागातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर या आगीची कल्पना पोलीस व अग्निशामन दलाला फोनवरुन दिली. त्यामुळे परिसरातील विज तातडीने बंद करण्यात आली.
आगीचा लोट वर असलेल्या मोबाईल टॉवर कडे केबल जळत जाऊ लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी बीएसएनएलचे ऑफिस उघडून त्यातील अग्निशमन सिलेंडर चा उपयोग करून ऑफिस मधील आग नियंत्रणात आणली.तसेच मोबाईल टॉवर कडे जाणारे आगीवर पाण्याचा मारा करून आग पुर्णपणे विझवली. अग्निशामन दलाला आग विझली असल्याचे कळविण्यात आले आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दूरसंचार विभागाचे ऑफिस असलेल्या परिसरात विकास सोसायटीचे मुख्य कार्यालय पोस्ट ऑफिस तसेच अनेक दुकाने, परमिट रूम बियर बार, टी व्ही केबल ऑफिस व रहिवाशी घरे आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाल्याने होणारे मोठे नुकसान टळले.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.यावेळी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय पाटील,व्हा.चेअरमन बाळासो थोरात,संचालक संदिप माळी, प्रशांत कुलकर्णी, सचिव निलेश रिसवडकर, बाळासो हंकारे,प्रकाश पाटील,चंद्रकात पाटील,रविंद्र फासे,अमोल लिगाडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.