प्रतिष्ठा न्यूज

सावळजमधील सुमित पाटील याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF)पदी निवड सावळजच्या शिरपेचात मानाचा तुरा सुमित पाटील वर शुभेच्छांचा वर्षाव

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज : सावळज ता.तासगाव येथील सामान्य कुटुंबातील अतिशय खडतर परिश्रम करत सुमित शंकर पाटील या युवकाची केंद्रीय सशस्त्र दलात केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलामध्ये (CISF) पदी निवड झाली.सावळजसह परिसरातुन त्याच्या य़शाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुमित शंकर पाटील याने दहावी पर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय सावळज येथे घेतले. बारावी पर्यंत तासगाव विद्यानिकेतनला पुर्ण केले.नंतर बीएस्सी ऍग्री शिक्षण चिपळुन येथे केले.त्याने स्टाफ सिलेक्शन ची परिक्षा देऊन सर्वच परिक्षात अव्वल मार्क मिळवत यश संपादन केले.दोन महिन्यात त्याला पोस्टींग मिळणार आहे.केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलामध्ये विशेषत: विमानतळ सुरक्षा,अतिमहत्वााच्या व्यक्तींची सुरक्षा साठी निवड केली जाते.

सुमित पाटील यांचे वडील शंकर पाटील हे शेतकरी आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीतही मुलगा हुशार असल्याने त्यांनी शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची उणीव भासू दिली नाही. तसेच चुलते पै. गजानन पाटील यांचेही मार्गदर्शन सुमित यास लाभले त्याची केंद्र सरकारच्या सेवेसाठी निवड झाल्याने त्यांच्या परिश्रमाचे सार्थक झाले. सावळजसह परिसरातून सुमित पाटील याच्या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.