प्रतिष्ठा न्यूज

खाडे पब्लिक स्कूलमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून नागपंचमी साजरी !

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : दास बहू उद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव या शाळेमध्ये नागपंचमी वैज्ञानिक दृष्टिकोनातून साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे उपक्रमाविषयी अधिक माहिती देत म्हणाल्या, “आपल्या महाराष्ट्रीयण सणांना विशेष महत्त्व आहे. तसेच प्रत्येक सणांच्या मागे काही शास्त्रीय कारणे आहेत. या सणांविषयी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. यासाठी सर्व सण साजरे केले जातात व त्यामागील शास्त्रीय करणं सांगितली जातात”.
       यावेळी पर्यावरण प्रेमी व सर्पमित्र यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये ऍड. बसवराज होसगौडर, सचिन शिनगारे, अथर्व वजे, सतीश माळी यांचा सहभाग होता. या उपक्रमामध्ये अथर्व वजे यांनी मुलांना सापांच्या प्रजाती, महाराष्ट्रात आढळणारे साप, सापांची ओळख, विषारी साप व बिनविषारी साप कसे ओळखावे? याची माहिती चित्रपट प्रक्षेपण यंत्राद्वारे दाखवली.  या उपक्रमाच्या माध्यमातून सापांविषयी असणाऱ्या मुलांच्या मनातील शंका व गैरसमज दूर होण्यास मदत झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी सापाला न मारण्याचे वचन दिले. तसेच साप पाहिल्यास दिलेल्या  सूचनांचे पालन कारण्यांचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे नागपंचमी या सणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन येण्यास मदत झाल्याचे समाधान सर्पमित्र अथर्व वजे यांनी व्यक्त केले.
        या उपक्रमाचे नियोजन शिक्षिका पल्लवी कुंभार, भाग्यश्री उपाध्ये, अंजली जाधव यांनी केले होते.  या उपक्रमासाठी संचालिका सुमन खाडे, सुशांत खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, जोस्तना माने, मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, योगेश रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.