प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा 32 वा वर्धापन दिन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हातील मिरज येथील नामवंत व प्रतिथयश शैक्षणिक संकुलात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या संस्थेच्या 32 वा वर्धापन ‌दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे बापू जाधव यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला ते म्हणाले, की मातृ-पितृ ऋणातून मुक्त होणे शक्य नसले तरी ते ऋण मनात ठेवून समाजासाठी काहीतरी विशेष करणे अत्यंत महत्त्वाचे असते. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या संकुलाचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी एक आदर्श भावी पिढीपुढे ठेवला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

आज जीपीएमटी शैक्षणिक संकुलामुळे मिरज विद्यानगरी म्हणून अधिक उठून दिसत आहे. या संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, नर्सिंग,फिजिओथेरपी या शाखांमधून वैद्यकीय शिक्षण, डी. एड. व बी. एड. कॉलेजच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण, सीबीएसई व स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रिप्रायमरी व प्रायमरी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची गौरवशाली परंपरा निर्माण करुन सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सहकार चळवळीतून महाराष्ट्राच्या प्रगतीत अत्यंत भरीव आणि लक्षवेधी योगदान राहिलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी खासदार आणि सहकार तपस्वी आणि पृथ्वीराज बाबांचे पूज्य आबा स्व. गुलाबराव पाटील यांच्या लोकसेवेच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी दिलेला निःस्वार्थी कार्याचा वारसा आणि आत्मविश्वास यामुळेच जीपीएमटी विस्तारली आणि महाराष्ट्राच्या सेवेत हजारो डॉक्टर, नर्सिस, शिक्षक,प्राध्यापक, अभियंते क्लास वन अधिकारी आणि कुशल मनुष्यबळ लाभले हे संस्थेच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांची बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देणारी लक्षवेधी कामगिरी आहे.

प्रास्ताविक आणि प्रमुख पाहु‌ण्यांची ओळख प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे यांनी केली या प्रसंगी संकुलातील सर्व शाखांचे प्राचार्य, विभागप्रमुख, समन्वयक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

केंब्रिज स्कूलचे प्राचार्य साहेबलाल शरीकमसलत यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व विश्वस्त ॲड. विरेंद्रसिह पाटील यांची प्रेरणा नेहमीच संकुलाला लाभते. या कार्यक्रमास संकुलाचे समन्वय प्राचार्य डॉ. सतिश पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.