प्रतिष्ठा न्यूज

११ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमादित्य चव्हाण, अनुजा कोळी तर १३ वर्षाखालील गटात आयनिश मद्रुपकर, जिया महात करणार जिल्ह्याचे नेतृत्व

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
 सांगली : ११ वर्षाखालील मुले विक्रमादित्य चव्हाण , मुलीच्या गटात अनुजा कोळी विजेते तर, १३ वर्षाखालील मुले आयनिश मद्रुपकर, मुलीच्या गटात जिया महात विजेते. तसेच अव्दैक फडके व आस्था यलमल्ली ,काव्य शहा  मृण्मयी गोसावी उपविजेते.
       सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन  मान्यतेने केपीएस चेस  अँकँडमी यांच्यावतीने राधेय डेंटल यांच्या सहकार्याने सांगली जिल्हा ११ वर्षाखालील मुलांमुलीच्या स्वतंत्र निवड बुध्दिबळ स्पर्धेच्या मुलांच्या गटातील सातव्या फेरीत आल्हाद सोहनी व विक्रमादित्य चव्हाण यांच्यातील डावात विक्रमादित्यने आल्हादचा पराभव करून ७ गुणासह विजेतेपद पटकाविले.
आदित्य चव्हाण व अव्दैक फडके यांच्यातील डावात आदित्यचा अव्दैकने पराभव करून ६ गुणासह उपविजेतेपद पटकाविले. आशिष मोठेने  कश्यप खाकंरीयाचा तर मंथन शहाने अरनेश नांदगावेचा पराभव करून अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला.
११ वर्षाखालील मुलांच्या गटातील ७ व्या फेरीअखेर गुण व  विजेते खालीलप्रमाणे –
१)विकमादित्य चव्हाण -७, २) अव्दैक फडके -६,
३)आशिष मोठे – ६, ४) मंथन शहा -५.५
९ वर्षाखालील उत्कृष्ठ – कश्यप खाकंरीया, अवनीत नांदणीकर, अव्दैत घोडके
७ वर्षाखालील उत्कृष्ठ – क्षितीज चव्हाण,अंश घोडावत,शौर नांगरे.
 *उत्तेजणार्थ बक्षिसे* :- युगंधर झांबरे, विराजित दाईगडे.
मुलीच्या गटात अनुजा कोळीने आस्था यालामल्लीचा पराभव करून ४ गुणासह विजेतेपद पटकाविले तरआस्थाने ३ गुणासह उपविजेतेपद पटकाविले.ईश्वरी पुजारीने अनन्या गायकवाडचा तर अविरा फडकेने अन्वी कुणलेचा पराभव करून अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान पटकाविले.
११ वर्षाखालील मुलींच्या गटातील ४ थ्या फेरीअखेर गुण व  विजेते खालीलप्रमाणे –
१)अनुजा कोळी -४, २) आस्था यालामल्ली – ३
२)ईश्वरी  पुजारी -३, ४) अविरा फडके -३  , उत्तेजनार्थ – रितिका गेडाम
१३ वर्षाखालील मुलांच्या गटात ६ व्या फेरीत आयनिश मद्रुपकर व ईशान कुलकर्णी यांच्यातील डावात दोघांनी धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला अर्ध्या गुणासह आयनिशने ५.५ गुणासह विजेतेपद पटकाविले तर ईशानला ५0 गुणासह  तिस-या स्थानावर जावे लागले.काव्य शहा व पियुष माने यांच्यातील डावात काव्यने पियुषचा पराभव करून ५ गुणासह बुकलोझ गुणाच्या जोरावर ५ गुणासह उपविजेतेपद पटकाविले.
सुवेद्रु कुंभार व जैद मुजावर यांच्यातील डावात सुवेंद्रुने जैदचा पराभव करून ५ गुणासह चौथे स्थान पटकाविले.१३ वर्षाखालील मुलांच्या गटातील ६ व्या फेरीअखेर गुण व  विजेते खालीलप्रमाणे –
१)आयनिश मद्रुपकर – ५.५, २) काव्य शहा – ५
३)ईशान कुलकर्णी -५, ४) सर्वेंद्रु कुंभार – ५
१३ वर्षाखालील मुलींच्या गटात ३ -या फेरीत जिया महात व सारा हरोले यांच्यातील डावात जियाने साराचा पराभव करून जियाने ३ गुणासह विजेतेपद पटकाविले.स्वरा बावडेकर व मृण्मयी गोसावी यांच्यातील डावात मृण्मयीने स्वराचा पराभव करून २.५ गुणासह उपविजेतेपद पटकाविले.अंकिता नरळेने दिपिका मोदानीचा पराभव करून २ गुणासह तिसरे स्थान पटकाविले.
१३ वर्षाखालील मुलींच्या गटातील ३ ऱ्या  फेरीअखेर गुण व  विजेते खालीलप्रमाणे –
१)जिया महात -३, २) मृण्मयी गोसावी -२.५
३)अंकिता नरळे -२, ४) सारा हरोले-१.५
११ व १३ वर्षाखालील मुलीच्या स्वतंत्र निवड बुध्दिबळ स्पर्धेच्या  पारितोषिक वितरण समारंभ पोलिसप्रमुख दिक्षित गेडाम, . डाँ.प्रियंका गेडाम, दिपाली खैरमोडे यांच्याहस्ते तर ११ व १३ वर्षाखालील मुलांच्या गटातील स्पर्धेचा  पारितोषिक वितरण समारंभ प्रख्यात सरकारी वकील प्रमोद अकुंश भोकरे व सांगली जिल्हा बुध्दिबळ असो. चे सचिव  चंद्रकांत वळवडे , यांच्याहस्ते व  विजय माने, पौर्णिमा उपळावीकर- माने, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेचे संयोजन  केपीएस चेस ॲकॅडमीने केले होते.
११ वर्षाखालील स्पर्धेतील पहिले २ विजेते मुले व मुली रत्नागिरी येथे होणा-या राज्य निवड स्पर्थेत तर १३  वर्षाखालील स्पर्धेतील पहिले २ विजेते मुले व मुली नागपूर येथे होणा-या राज्य निवड स्पर्थेत सांगली जिल्हयांचे प्रतिनिधीत्व करतील.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.