प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सुधारीत नियोजन आराखडा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३३ पोटकलम १(ब) रहदारी अधिकारान्वये,तासगांव नगरपरिषद क्षेत्रातील वाहतूक सुरळीत राहणेसाठी सुधारित वाहतुक नियोजन जाहिरनामा प्रायोगिक तत्त्वावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.तासगांव शहरातील वाहतूक कोंडी नागरिकांची रस्ता सुरक्षा प्रस्थापित होणेसाठी मोटार वाहनांची होणारी गर्दी तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी,शाळा, कॉलेज,ग्राहक पंचायत व्यापारी, स्वयंसेवी संस्था इ.लोकांनी वेळोवेळी केलेल्या सुचना गृहीत धरुन सर्व वाहनांना वाहतुकीसाठी एक दिशामार्ग प्रवेश बंद,पी-१ पी-२ पार्कीग सुविधा नो पार्किंग झोन वाहतूक करणाऱ्या वाहनाची व्यवस्था खालीलप्रमाणे सर्व वाहनांना वाहतुकीसाठी एकदिशा मार्ग,प्रवेश बंद,नो-पार्किंग झोन, वाहतूक करणाऱ्या वहानांची व्यवस्था इत्यादी सुविधा करणेबाबतचा जाहिरनामा प्रसिद्ध करणेत आला आहे.तो खालील प्रमाणे
१- शहरातील प्रमुख दोन (राज्य महामार्ग क्र १० व १३६) रस्त्यावर असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानातील
माल उतरविण्याच्या वेळा
दुपारी १.०० ते ३.३० सायंकाळी ८ नंतर रस्त्यासाठी पार्कीगच्या पट्ट्याच्या आतील बाजुला वाहन उभा करुन माल उतरविणेस परवानगी देण्यात येत आहे.चार चाकी वाहनातून माल उतरवित असताना ड्रायव्हर वाहनातच असणे बंधनकारक राहिल.
२-शहरात येणाऱ्या मालट्रक साठी पार्कींग व्यवस्था-
विटा रिंगरोड चौकाचे नजिक (रिंगरोडवर)चार चाकी जड वाहने
-सांगली रस्ता औद्योगिक वसाहत व वृदांवन कॉलनी रस्ता -भिलवडी रस्ता रिंगरोड चौकानजिक,
३-दुचाकी पी-१ व पी-२ पार्कींग व्यवस्था-
स्टैंड चौक ते कोकने कॉर्नर (पी-१, पी-२)
जोशी गल्ली (पी-१, पी-२)
स्टैंड चौक ते हनुमान मंदिर मार्गे गणपती मंदिर (पी-१, पी-२) गणपती मंदिराचे समोरील मोकळ्या जागेत मारलेल्या पट्टयांच्या आत
विटा नाका मस्जीद रोड ते माळी गल्ली रोड पर्यंत डाव्या बाजूस दोन चाकी पार्कीग (पी-१, पी-२)
सांगली नाका पिकअप शेड ते जमादार गल्ली बोळापर्यंत दोन चाकी पार्कीग (पी-१, पी-२)
पंचायत समिती कार्यालयाच्या उजव्या बाजूस व समोरील बाजूस दोन चाकी पार्कींग व चार चाकी
पार्कीग.(पी-१.पी-२)
चिंचणी नाका चौक ते खाटीक गल्ली मस्जीदपर्यंत (पी-१. पी-२)
सिद्धेश्वर चौक सर्व बाजूनी २५ मीटर सोडून हाटकेश्वर मंदिरापर्यंत पूर्वेकडील बाजूस.
४-चार चाकी पार्कींग व्यवस्था-
छत्रपती शिवाजी महाराज मार्केटचे तळघर,हनुमान मंदिर ते काशिविश्वेश्वर मंदिर रोडवर (पी-१,पी-२) पद्धतीप्रमाणे बोथरा हॉस्पीटल ते कापुरओढा रोडवर,विटा नाका ते कोहिनूर मंगल कार्यालया पर्यतचे रोडचे कडेला पट्ट्याच्या आत,
सिद्धेश्वर मंदिर चौकात सर्व बाजुनी २५ मीटर सोडून हाटकेश्वर मंदिरापर्यंत पश्चिम बाजूस,पंचायत समिती कार्यालयाच्या उजव्या बाजुस व समोरील बाजूस,तासगाव कोर्टाचे पुढील गेटचे समोर एसटी स्टँडचे कंपाऊडचे भिंतीस लागून रामविलास हॉटेल पर्यंत ५ गाड्यांसाठी.
गणपती मंदिराचे मागील बाजूस मंदिराचे पार्कींग (पे अँड पार्क),
गणपती मंदिर ते पोस्ट ऑफीस रोडवर गणपती मंदिराचे भिंतीस लागून,पाटबंधारे विभागाचे मोकळ्या जागेत,जिल्हा परिष्द शाळेसमोरील मोकळ्या जागेत,हंकारे समाज मोकळी जागा,
५-चार चाकी व दुचाकी नो पार्कींग झोन-
जोशी गल्ली (अॅम्ब्युलन्स व मेडीकल इमर्जन्सी सोडून तसेच व्यापारी माल हा नियोजित वेळेत उतरणेकामी,
स्टैंड चौक ते सिद्धेश्वर चौकार्यत,
विटा नाका ते मिरज वेस (बोथरा हॉस्पीटल मागे सांगली बायपास),
सांगली नाका ते गणपती मंदिर मार्ग हनुमान मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते घिसाडी पुल मार्गे जयहिंद चौक,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बी.एस.एन.एल ऑफिसपर्यंत,
६- एक दिशा मार्ग-
हनुमान मंदिर-बोथरा हॉस्पीटल-मिरज वेस मार्गे सांगली नाका,
सांगली नाका-गणपती मंदिर चौक-शनि मंदिर,गणपती मंदिर-जोशी गल्ली-वंदेमातरम चौक (फक्त २ चाकी वाहने),
७-नो एन्ट्री/प्रवेश बंद-
विटा रोडवर बस स्टैंड जवळील मार्केट यार्ड प्रवेश गेट मधून चार चाकीसाठी प्रवेश बंद,मार्केट यार्ड ते बागवान चौक चार चाकी वाहनास प्रवेश बंद, वंदेमातरम चौक ते गणपती मंदिर चार चाकी वाहनासाठी प्रवेश बंद,
पोस्ट ते गणपती मंदिर कडे प्रवेश बंद चारचाकी वाहनासाठी,
जयहिंद चौक -गिसाडी पूल मार्गे गणपती मंदिर चार चाकी वाहनसाठी प्रवेश बंद,सेंट्रल स्कुल बोळ (डी.एड. कॉलेज) पासून गणपती मंदिराकडे जाणेस प्रवेश बंद आहे.
८- जड वाहतूक प्रवेश मार्ग-
विटा व आटपाडी कडून येणारी जड वाहतूक ही विटा नाका-एसटी स्टँड चौक-हनुमान मंदिर-मिरज वेस,
कॉलेज कॉर्नर वरून-सांगलीकडे किंवा भिलवडी नाका मार्गे पाचवा मैल अशी होईल, तसेच पलूस भिलवडी या ठिकाणांवरून होणारी जड वाहतूक ही पाचवा मैल-भिलवडी नाका-सिद्धेश्वर चौक-एस टी स्टैंड चौक ते विटा नाका मार्गे आटपाडी व विटा करिता जाईल.
९- वाहतूक करणारे भाड्याने टॅम्पो व्यवसाय करणारे यांना जागा निश्वित. विटा नाका-महात्मा गांधी उद्यान समोरील रस्त्याचे बाजूने श्री माळी यांचे समोरील जागेत,मार्केट यार्ड परिसर.
१०- टॅक्सी (टूरिस्ट) वाहतूक भाड्याने करनारी वाहने.
तहसील कार्यालय परिसर.
११- वडाप वाहनांना ठिय्याः-
शाळा नं २ चे बोळात,सांगली रोड कमानीच्या बाहेर नारळीच्या बागेत गाड्या उभ्या करणे,विटा नाका रस्त्याचे बाहेरील आरवडे रोड,पूणदी रोड,विटा रोड ५० मीटर पुढे,
चिंचणी रोड मार्केट यार्डसमोरील पडिक जागा..
१२-अॅटो रिक्षा स्टैंड बाबतः-
एस टी स्टँडचे उत्तर बाजूस छत्रपती शिवाजी मार्केट ची दोन्ही गेट सोडून, सांगली नाका बगीचा मोकळी जागा,
सिद्धेश्वर चौक एक रिक्षासाठी,वंदे मातरम चौकात दोनही बाजूस एक एक रिक्षा..
१३- लक्झरी स्टॉपबाबतः-
पाण्याचे टाकीजवळ,तहसीलदार ऑफीस परिसरात…
सदरचा जाहिरनामा दि-१५/०२/२०२४ ते दि.०१/०३/२०२४ रोजी पर्यंत १५ दिवसांकरिता प्रायोगिक
तत्त्वावर राबविण्यात येत आहे.याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
तरी नागरिक,रहिवाशी,मोटार वाहन चालकांनी व जनतेने नमूद बदल केंलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे.तसेच आपल्या हरकती,सुचना सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा तासंगाव किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्याकडे लेखी स्वरुपात पाठवाव्यात जेणेकरून प्राप्त झालेल्या सुचनांचेयेतील अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करणेत येतील.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.