प्रतिष्ठा न्यूज

शुक्रवारी कवलापूरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे कृषी मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : समस्त मानवी जात सुखी आनी समाधानी झाली पाहिजे या सर्वोच्च मूल्यांचे जतन करणारे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर यांच्या माध्यमातून कवलापूर येथे शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख
व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व अष्टसिद्धी महाशक्तीपिठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांचे परम श्रध्देय शिष्य व सुपुत्र श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकचे विश्वस्त कृषीभूषण श्री आबासाहेब मोरे हे उपस्थितांना कृषी क्षेत्रातील विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
कवलापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सदर कृषी मेळावा संपन्न होणार आहे.आध्यात्मिक शेती,सेंद्रिय शेती,शेतीचे वास्तूशास्त्र,रासायनिक खतांचे दुष्परिणाम,कृषीशास्त्र,  आयुर्वेद व आरोग्य,आदर्श शेती, अपारंपरिक उर्जा,पशुधन,गोवंशाचे संवर्धन, दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या करिता पंचसूत्री कार्यक्रम,पर्यावरण आदी विषयावर कृषीभूषण श्री आबासाहेब मोरे मार्गदर्शन करणार आहेत.तसेच मानवी समस्या, ग्रामविकास अभियान आणि सेवा क्रेंदाची सेंद्रिय शेतीची वाटचाल याविषयीच्या मार्गदर्शनांतर्गत अमृततुल्य हितगुज संपन्न होणार आहे.श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमा बरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून आजवर संपूर्ण देशात सुमारे १५०० हून अधिक कृषी मेळावे घेऊन बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांना आधुनिक शेती व तंत्रज्ञान सह पारंपरिक शेती,आध्यात्मिक शेती,सेंद्रिय शेतीचे प्रबोधन केले जात आहे.आज मानवाला सात्विक,रसायन व विष मुक्त अन्नधान्याची खूप गरज आहे, कारण सात्विक आहारातून सात्विक विचारांची निर्मीती होते.आदर्श समाजाची जडणघडण करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा सर्वांनी अवलंब करणे गरजेचे आहे.कृषीक्षेत्रातील सामाजिक विषमता दूर करून जनमानसात कृषीविषयी आवड निर्माण करणे हा या कृषीमेळाव्याचा आयोजनचा उद्देश आहे.उत्तम शेती, मध्यम व्यापार,कनिष्ठ नोकरी या धेय्याने कृषीभूषण श्री आबासाहेब मोरे यांनी नाशिकमध्ये जागतिक पातळीवरील आत्ता पर्यंत दहा जागतिक कृषी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना,कृषी अधिकारी, सेवाभावी संस्था,प्रयोगशील शेतकरी व विद्यार्थ्यांना यांचा लाभ झालेला आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत याकरिता धर्म,देश,प्रांत,सीमा या भेदाच्यांही पलीकडे उद्बोधन करणारे व ग्रामअभियानातून भारतीय संस्कृती जपून राष्ट्रीय विकासाची  वृध्दी करणारे व विश्वकल्याणात्मक  संस्कार रुजविण्यासाठी आदरणीय गुरुपुत्र कृषीभूषण श्री आबासाहेब मोरे यांचे भव्य नवचैतन्य अमृततुल्य हितगुजाचे आयोजन करण्यात आले आहे.यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यांत येणार आहे.सेवा केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ८.०० वा. भूपाळी आरती,१०.३० वा.महानैवेद्य आरती तसेच विविध समस्या वरती मोफत मार्गदर्शन व प्रश्नोत्तर सेवा, रान भाज्या महोत्सव,भारतीय संस्कृतीत संपन्न होणाऱ्या सणाचे प्रात्यक्षिक आदी स्टॉल मांडले जाणार आहेत.या मेळाव्याचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,सिद्धेश्वर मंदिर कवलापूर येथील सेवेकरी श्री कृष्णा आंबे,श्री चंद्रशेखर रीसवडे,श्री राजेंद्र पाटील,श्री किशोर कुंभार,श्री सुरेश मुके,श्री विश्वास रीसवडे,सौ शुभांगी नलावडे,सौ.अर्चना माळी,सौ.सविता पाटील,सौ.मनिषा पाटील,सौ.रंजना माळी,अश्विनी माळी व समस्त कवलापुर ग्रामातील व पंचकृषीतील सेवेकरी यांनी केलेले आहे.या मेळाव्याला जिल्ह्यातील मान्यवर,वरिष्ठ कृषीअधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी सांगली जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी,सर्व महिला, शेतकरी,युवक – युवती,कृषी प्रतिनिधी तसेच प्रशासकीय कृषी प्रतिनिधी,नागरिक,भाविक व  लोकप्रतिनिधी यांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कवलापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहीतीसाठी संपर्क :
श्री चंद्रशेखर रीसवडे :7304957111
श्री कृष्णा आंबे : 99602 60234
श्री किशोर कुंभार : 9284271143
श्री सुरेश मुके :  94212 21071
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.