प्रतिष्ठा न्यूज

कुंडल येथील आशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद : युवराज सरनोबत

प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : कुंडल येथील आशा सेविका स्वाती भूषण ,खारगे यांचे नूतन श्री स्वामी समर्थ झेरॉक्स सेंटरचे* उद्घाटन कुंडल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री युवराज सरनोबत,रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड दिपक लाड, स्वाद मसाला चे प्रमुख बाबासाहेब पवार,माजी पंचायत समिती उपसभापती राजेंद्र खारगे,पोपटराव,सूर्यवंशी,
शशिकांत निकम व आशा सेविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी API युवराज सरनोबत म्हणाले ‘आशा सेविका’ नेहमीच अर्थिक मोबदल्याचा विचार न करता समाजासाठी अहोरात्र सेवा भावी काम करत असतात समाजातील आशा सेविकांच्या पाठीशी सदैव समाजाने राहिले पाहिजे, आशा सेविकांना आर्थिक
दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासन व विविध संस्थांनी व्यवसायिक मार्गदर्शन व सहकार्य करणे गरजेचे असल्याचे API सरनोबत यांनी मत व्यक्त केले.
ॲड दिपक लाड म्हणाले
रणसंग्राम सोशल फाऊंडेशनचा आशा सेविकांना कायमच पाठिंबा आहे, सर्व आशा भगिणी म्हणजे म्हणजे समाजाच्या उत्तम रक्षक आहेत, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मनोगत ॲड दिपक यांनी व्यक्त केले.
यावेळी मनोहर खारगे, डॉ पंढरीनाथ खारगे, भूषण खारगे, कुलकर्णी काका, अमोल कारंडे, स्वाती खारगे,छाया खारगे, श्रद्धा खारगे,आशा सेविका सरिता लाड, सारिका लाड, अनिता सावत, अर्चना कोळी, व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.