प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समितीचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला..खासदार संजय काका पाटील; राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय नेते पहिल्यांदाच एकवटले

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : आमदारांच्या बाबत सहानुभूती होती,त्यामुळे आम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले.मात्र आमदारांच्या आडून राष्ट्रवादीत भ्रष्टाचाराचे कुरण तयार झाले आहे. बाजार समितीचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे.यासाठीच गट,तट बाजूला ठेवून सर्वजण एकत्रित आलोय,तीन दिवसात भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांचे नाव न घेता खासदार पाटील यांनी आज दिला.बाजार समिती बचाव सर्वपक्षीय पॅनलच्या प्रचार शुभारंभ नंतर नवीन  बाजार समितीच्या निकृष्ट बांधकामाची खासदार संजय काका पाटील यांनी पाहणी केली यावेळी काका पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर प्रताप नाना पाटील, तासगाव कवठेमंकाळचे भाजप अध्यक्ष स्वप्निल पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सरपंच परिषदेचे प्रदीप माने,शिवसेनेचे सरपंच अरुण खरमाटे,जिल्हा परिषद सभापती प्रमुख शेंडगे,पंचायत समिती सदस्य सुनील जाधव,आर डी पाटील, सुखदेव पाटील,यांच्यासह बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी बोलताना खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या एकूणच बाजार समितीतील भ्रष्ट कारभाराचा पंचनामा केला ते म्हणाले पूर्वीपासून या पेठेला खूप महत्त्व आहे पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पेठ म्हणून मार्केट कमिटीला ओळखले जाते,पण आजची दशा आणि दुर्दशा पाहून मनाला वेदना होतात यासाठी खूप गोष्टी कारणीभूत आहेत त्यातला भ्रष्टाचार हा एक सगळ्यात मोठा आपण पाहतो भ्रष्टाचारांना बरबटलेली ही संस्था लोकांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या हितासाठी चालावी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी तासगाव तालुक्यातील सर्वपक्षीय  प्रमुख मंडळी या ठिकाणी या लढ्यामध्ये सामील झालोय त्यात गट पक्ष पार्टी कसलाही विचार न करता शेतकरी आणि या पेठेला पुन्हा पूर्वीपेक्षा चांगलं वैभव मिळून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलोय हे उभारलेले मार्केट 8 – 9 वर्ष तसेच पडून आहे,आम्ही सगळ स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतोय आणि या परिसरातल्या या विभागातल्या नवीन उद्योजकांना हे मार्केट पुन्हा उभा करून आणि स्वतः लक्ष घालून नवीन उद्योजक यामध्ये यावेत तरुण मुलांना संधी मिळावी वाव मिळावा या उद्देशाने मार्केट पुन्हा एकदा ताकतीने उभे करतोय.शेतकऱ्यांना चांगले दर मिळावेत या उद्देशाने सगळ्यांनी एक उद्देश डोळ्यापुढे ठेवून ही निवडणूक आम्ही लढवतोय त्यामध्ये सुज्ञ सगळे सभासद हे निश्चितपणाने आम्हाला न्याय देतील असा विश्वास खासदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख व सरपंच परिषदेच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे प्रदीप माने हे आज प्रचाराच्या शुभारंभ वेळी बाजार समिती बचाव पॅनल सोबत होते. त्यामुळे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी  शिवसेना शिंदे गटासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गट बाजार समिती बचाओ पॅनल मध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.