प्रतिष्ठा न्यूज

दूध दरवाढीसह मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उग्र आंदोलनाचा इशारा; अन्न औषध प्रशासन पाकीट घेऊन कामं करतय : प्रदीप माने पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : गाई आणि म्हैशीच्या दुधाला मिळणारा अपुरा दर,दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यांचा सामना करणार्‍या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांचा धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी मार्केट यार्ड येथून मोर्चास सुरुवात होऊन तहसील कार्यालय येथे सांगता झाली.
यावेळी दुध दरवाढ झालीच पायजे, सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप माने म्हणाले की,सरकारने वेळोवेळी पोकळ घोषणा करून सातत्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केला,असून सध्या गाईच्या दुधाला सांगली जिल्ह्यात 28 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 48 रुपये दर देण्यात येतो.परंतु आता गाईच्या दुधाला 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये दर देण्यात यावा अशी प्रमुख मागणी असून,दूध पावडर आणि दुधात होणारी भेसळ थांबली पायजे अशी मागणी करण्यात आली आहे.आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.शिवाय शासनाकडून जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे.त्यामुळे,आम्हाला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्यावा,तसेच भाकड जनावरांना महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावे आणि मोफत विमा सुद्धा मिळावा.जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात सरकारला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप माने पाटील,पुरण मलमे,निमणीचें आर.डी.पाटील,विशाल शिंदे,संजय दादा पाटील,बाहुबली पाटील,सम्मेद पाटील,रमाकांत पाटील,अमित पाटील,अरुण यादव,प्रशांत महाडिक आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन कारवाईची नौटंकी करून निव्वळ पाकीट घेण्यामध्ये व्यस्त असतात अशा मुजोर अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी…
प्रदीप काका माने पाटील 
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.