प्रतिष्ठा न्यूज

शनिवारी इस्लामपूर येथे महाकवी कालिदास दिनानिमित्त खुले कविसंमेलन

प्रतिष्ठा न्यूज
वाळवा प्रतिनिधी : आषाढातील प्रथम दिवस हा कविकुलगुरु महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून संस्कारभारती सांगली जिल्हा समिती साहित्य विधा आणि अपंग शिक्षण संस्था, इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सदरचे खुले कविसंमेलन मूक-बधिर शाळा सभागृह, दत्त टेकडीजवळ,कामेरी रोड, इस्लामपूर येथे संपन्न होणार आहे. ज्येष्ठ कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, इस्लामपूरचे अध्यक्ष डॉ. दीपक स्वामी हे या कवीसंमेलनाचे अध्यक्ष असून उदघाटक म्हणून वाळवा-शिराळा तालुका कवी -लेखक संघटनेचे कार्याध्यक्ष, संपादक, प्रसिद्ध कवी धर्मवीर पाटील हे आहेत.
या कविसंमेलनाला प्रसिद्ध मानस तज्ञ आणि मसाप शाखा इस्लामपूर चे कार्यकारिणी सदस्य कालिदास पाटील आणि आर.आय.टी चे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय कुंभार हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कविसंमेलनाचे संयोजन कवयित्री सुनीता कुलकर्णी, महादेव हवालदार, साहित्यिक मेहबूब जमादार, प्राजक्ता देशपांडे, दिलीप गिरीगोसावी आणि आनंदहरी हे करीत असून सर्व कवी -कवयित्री आणि काव्यरसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्कारभारती जिल्हा समिती अध्यक्ष माधव वैशंपायन, अपंग शिक्षण संस्था, इस्लामपूरचे सचिव अभिमन्यू रानमाळे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.