प्रतिष्ठा न्यूज

नांदेड प्लॉग्गेर्स संघा कडून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम प्लास्टिक फ्री शहर जण जागृती करण्याचा प्रयत्न

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
 नांदेड : नांदेड प्लॉग्गेर्स (NANDED PLOGGERS) हा एक नांदेड शहरातील  तरुणांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघ आहे. या मध्ये शहरातील  विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सगळे तरुण एकत्र येऊन प्रत्येक रविवारी शहरातील वेगवेगळ्या नगर भागातील प्लास्टिक फ्री शहर करण्यासाठी  स्वच्छता मोहीम घेऊन जनजागृती साठी प्रयत्न करत आहेत.
नांदेड प्लॉग्गेर्स (NANDED PLOGGERS) या मोहिमेसाठी  2 तास श्रमदान करतात.या दरम्यान नांदेड प्लॉगर्सशी 250-300 विध्यार्थी जोडले गेलेले आहेत.
या संघाने आता पर्यंत 35 मोहीम राबविल्या आहेत.या मोहिमेमध्ये विविध प्रकल्प, घाटाची स्वच्छता, शहरातील रिकाम्या जागेवरील कचरा, वृक्षारोपण, अन्नदानाची ठिकाण, ररस्त्यातील स्वच्छता, मंदीर परिसर अशा अनेक ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आले आहेत.या मोहिमेमुळे शहरात स्वच्छता पहावयास मिळत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.