प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेकडून महिला दिनानिमित्त मंगळवारी महिलांचा सन्मान सोहळा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीकडून मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 विविध क्षेत्रातील कर्तुत्वसंपन्न महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती सभागृह नेत्या भारती दिगडे, महिला बालकल्याण समिती सभापती अस्मिता सलगर, समाजकल्याण समिती सभापती अनिता व्हनखंडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली
महिला दिनाचे औचित्य साधत मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी सायंकाळ 4 वाजता *भावे नाट्यगृह सांगली* येथे हा सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात महापालिकेकडून समाजातील कर्तुत्वसंपन्न आणि महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त सुनील पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याचबरोबर महापालिकेतील महिला नगरसेविका,पदाधिकारी, अधिकारी , कर्मचारी, शिक्षिका, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर आणि महिला बचत गटाच्या सर्व महिला पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी सुमित नृत्य अकॅडमीकडून जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम तर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण हे सादर करणार आहेत. यावेळी महिला कर्मचारी यांच्या नृत्याविष्कार सुद्धा पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमास महापालिकेच्या महिला अधिकारी पदाधिकारी नगरसेविका यानी उपस्थित राहावे असे आवाहनही मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.