तासगावच्या भावना खंडागळेची तलाठीपदी निवड; सत्यविजय बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी मोहन खंडागळे यांची कन्या..
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव नागराज गल्ली येथील सत्यविजय बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी मोहन खंडागळे यांची कन्या भावना ही महाविदयालयीन शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती.टी.सी.एस. कंपनी मार्फत दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आलेली तलाठी पदाची परीक्षा तिने दिली होती.परीक्षा दिल्यानंतर आपणास या परीक्षेत यश निश्चित मिळणार असा विश्वास तिने व्यक्त केला होता.निकालाची प्रतिक्षा असतानाच बुधवारी तलाठी सरळसेवा पदभरती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथीली जिल्हा निवड समितीने तलाठी पदाची निवड यादी जाहिर केली.यामध्ये भावना मोहन खंडागळे हिला १८६.२३०८८ गुण मिळाले व तलाठीपदी तिची निवड झाल्याचे स्पष्ट झाले.या निवडीनंतर तासगांव परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले.