प्रतिष्ठा न्यूज

तासगावात शिंदेच्या शिवसेनेकडून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी.. भाजपा युवानेते प्रभाकर बाबांच्या उपस्थितीत पोवाड्याचा कार्यक्रम

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव येथे शिंदेच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख संजय दाजी चव्हाण यांच्या नेतृत्वात तिथी नुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.वंदे मातरम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तिचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून तासगाव येथे नवीन पाच शाखांचे उद्घाटन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तासगाव शहर प्रमुख संजय (दाजी) चव्हाण यांनी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार (बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी प्रबोधन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारा दयानंद माळी यांचा  शाहिरी पोवड्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.कार्यक्रमास भाजपा युवानेते प्रभाकर बाबा पाटील यांनी उपस्थित राहून संजय दाजी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या वेळी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे,सारंग पवार,नरेंद्र बनसे,स्वप्नील मस्कर, धनाजी पेंढारकर,सम्राट दळवी,  तासगाव उपशहर प्रमुख बशीत मुल्ला,इरफान सय्यद,सौरभ सुतार,विभाग प्रमुख दादा माळी, बजरंग रसाळ,विघ्नेश पोवारपवण चव्हाण,शाखा प्रमुख प्रवीण जाधव, विनोद साळुंखे,अभिजीत मुल्ला,कुमार चव्हान,ऋषिकेश कांबळे,भारत मंडळे,संपत रसाळ, युवासेना तालुका प्रमुख नंदू मंडले, युवासेना समन्वयक गुरू पाटील, वैद्यकीय कक्ष प्रमुख सद्दाम मुल्ला नेहाल मुल्ला इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.