प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दाखविली खाकीतील माणुसकी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक निंभोरे नेहमीच्या कामांमध्ये व्यस्त असताना साहेबांच्या मोबाईल वर राजस्थान येथील  भरतपुर येथून “आपणा घर “आश्रम मधून फोन येतो,तेथील कर्मचारी महिला साहेबांना माहिती देतात की आश्रमामध्ये बऱ्याच वर्षापासून एक तरुणी राहत असून तिला राजस्थान मधील स्थानिक पोलिसांनी सदर आश्रम मध्ये दाखल केली असून ती महिला फक्त तासगाव,तासगाव अशी माहिती मराठीमध्ये सांगते.साहेबांनी आश्रमातील कर्मचारी महिलांच्या कडून माहिती घेऊन संबंधित रेखा नावाच्या तरुणी बरोबर बोलणे केले असता संबंधित तरुणीस विश्वासात घेऊन चौकशी करून तीच्या घरच्यांविषयी माहिती घेऊन सदर तरुणीस विश्वास दिला की तुझ्या घरच्या मंडळींना संपर्क साधून तुला तुझ्या घरी येण्याची सोय करून देतो. असा शब्द देऊन साहेबांनी वासुंबे  गावातील सामाजिक कार्यकर्ते शितल हक्के यांना सोबत घेऊन रेखा हिने सांगितलेल्या नावाप्रमाणे रेखाचे घर शोधून रेखा गुरवच्या घरी  रेखा बद्दल माहिती विचारल्यानंतर घरच्यांनी ती बेपत्ता असले बाबत सांगितले.खात्री करून घेतल्यानंतर निंभोरे साहेबांनी  रेखा गुरव हिच्या सध्याच्या वास्तव्याबाबत घरच्यांना माहिती देऊन सुखद धक्का दिला.
 दुसऱ्या दिवशी रेखा गुरव हिचा भाऊ  श्री गणेश गुरव यांनी गावातील ग्रामपंचायत सदस्य व लोकराज्य न्यूज चॅनलचे पत्रकार श्री संतोष एडके यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर निंबोरे साहेबांनी गुरुवारी आलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क करून आश्रमातील महिला कर्मचाऱ्यांशी बोलून रेखा गुरव हिच्यासोबत तिच्या सख्ख्या भावाचे बोलणे करून दिले.सुमारे चौदा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले बहिणीसोबत बोलणे करताना गणेशला काय बोलावे हे समजत नव्हते त्यातून त्यांनी स्वतःला सावरत बहिणी बरोबर बोलून तिच्या तब्येतीची विचारपूस करून तुला मी लवकरच घेऊन जाण्यास येत आहे असा निरोप तिच्यासह आश्रमातील महिलांना दिला.
एकीकडे राज्यातील काही वादग्रस्त पोलिसांच्या मुळे पोलीस खाते बदनाम होत असताना निंभोरे साहेबांच्या या कृतीमुळे,संवेदनशीलतेमुळे रक्तातील नात्याची भेट घडवून दिली.व आपल्यातील माणुसकीचे दर्शन देऊन खाकी वर्दी मध्ये आजही पुष्कळ चांगले अधिकारी,कर्मचारी आहेत हे दाखवून दिले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.