प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव: सर्वाधिक गुण घेण्यात मुली अव्वल

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.30 : या विद्यालयातील सर्वात अधिक गुण घेण्यात मुलींनी बाजी मारली असून ; या शाळेतील मुली अव्वल ठरल्या आहेत.त्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
वसंतनगर येथील राजर्षी शाहू विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून इयत्ता इयत्ता दहावीमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त गुण व १२ वी बोर्ड परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेत शाळेचा निकाल ९७.३६ टक्के लागला असून 43 विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. शाळेची विद्यार्थिनी कु. धनश्री किशन पुयड हिने दहावीत ९८.६० टक्के गुण मिळवून तर बारावीत कु. दुर्गा किशन पांचाळ हिने ८६.३३ टक्के गुण प्राप्त करून शाळेत सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर १२वीचा निकाल ७६.८१ टक्के लागला आहे.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य बी.एम. हंगरगे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक डॉ. पी. एम. यमलवाड, पर्यवेक्षक पी.एम. सावंत, प्रा. आर.डी. देशमुख, सांस्कृतिक विभागप्रमुख एस. एल. टापरे हे होते. यावेळी कु.धनश्री पुयड, कु. दुर्गा पांचाळ या विद्यार्थिनींचा शाळेतून सर्वप्रथम आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच कु. वेदिका संजय हंबर्डे या विद्यार्थ्यिनीचा
सर्वाधिक ९८ गुण घेतल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच कु. गौरी हारकरी या विद्यार्थिनीने सामाजिकशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती मुक्कनवार व कु. प्राप्ती आळंदकर या विद्यार्थिनींनी केले, तर कु. वैष्णवी भांगे हिने उपस्थित पालक, गुरूजन वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.