प्रतिष्ठा न्यूज

तासगावात रविवारी डॉक्टर्स डे निमित्त जिल्हा मॅरेथॉनचे आयोजन… रन फॉर कम्प्लीट सोशल हेल्थचा नारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : युनायटेड बी ए एम एस डॉक्टर्स तासगाव तालुका या संघटनेच्या वतीने दरवर्षी डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय क्षेत्रातील सर्व लोकांसाठी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.यावर्षी देखील या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी 2 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजल्यापासून मॅरेथॉनचे उद्घाटन, झुंबा,फिजिओथेरपी इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
मॅरेथॉनसाठी जत,विटा,पलूस,आष्टा सांगली,मिरज अशा संपूर्ण जिल्ह्यातून डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून विट्याचे प्रांताधिकारी डॉ.विक्रमसिंह बांदल व सांगली शहरचे डी वाय एस पी मा.श्री अण्णासाहेब जाधव उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर तासगावचे तहसीलदार  मा.श्री रवींद्र रांजणे,पोलीस निरीक्षक मा.श्री भानुदास निंभोरे,मिरज पोलीस निरीक्षक मा.श्री संजीवकुमार झाडे, तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा.श्री पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणारआहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर शिवणकर,डॉ संतोष पाटील,डॉ जहीर नदाफ,डॉ.वैभव बरगुले,डॉ विजय माने,डॉ.मिलिंद जाधव,डॉ मनीषा शिंदे व सर्व यूबीडीचे डॉक्टर्स मॅरेथॉनचे संयोजन करीत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.