प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

MTDK उन्हाळी शिबिराचा सांगता समारोप उत्साहात संपन्न….

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : येथे दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांनी १५ दिवस व्यक्तिमत्व विकास  शिबिर आयोजित केले होते. या  शिबिराचा शुभारंभ डॉ. गणेश सिंहासने यांच्या प्रमुख उपस्थित झाला. जीवनात संघर्षासाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक सक्षमता अशा शिबिरातूनच निर्माण होते असे मत सिंहासने यांनी व्यक्त केले. तसेच आजच्या काळात अशा शिबिरांची गरज असल्याचे स्पष्ट केले. संघर्षमय वाटचाल करून आपण कसे यश मिळवले हे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवातील काही गोष्टी सांगितल्या.
           या शिबिरात सकाळचा व्यायाम, योगासने, पोहणे, रायफल शूटिंग, संगीत, नृत्यकला, चित्रकला व टॅटू यासारखे विविध प्रशिक्षण देण्यात आले. गिरलिंग (जुना पन्हाळा) कुकटोळी डोंगर चढण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. याशिवाय शिबिरार्थांसाठी विविध कला-क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या शिबिरात मिरज,  व आसपासच्या परिसरातून १०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सलग ३ ऱ्या वर्षी या शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिबिरात विद्यार्थ्यांना जे शिकवले त्याचे सादरीकरण समारोप सोहळ्यात करण्यात आले. योगासनांसह विविध खेळ प्रकार विद्यार्थ्यांनी करून दाखवत उपस्थित प्रमुख पाहुणे सुरेश चौधरी व पालक यांची वाहवा मिळवली.  या शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य डॉ सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.