प्रतिष्ठा न्यूज

तासगाव घिसाडी पुलानजीकचें सार्वजनिक शौचालय बंद करा.. शिवसेनेकडून निवेदन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जोशी गल्ली,नागराज गल्ली, गणपती मंदिर रोड,गुरुवार पेठ येथून ये जा करण्यासाठी असलेल्या प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर पूर्वी पासून असलेल्या शौचालायची सध्या दुरावस्था झाली आहे.तिथे असणाऱ्या तीन शौचालया पैकी फक्त एकच वापरात असून बाकीच्यां दोन्ही ठिकाणचे दरवाजे मोडले असून आतील भांडी फुटलेली आहेत. दरवाजे नसल्याने त्याठिकाणी दुर्गन्धी सुटून घाणीचें साम्राज्य पसरले आहे. ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा भयानक त्रास होत असून याठिकाणी डासांचे प्रमाण वाढले असून,लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहे.शौचालय शेजारी देशी दारूचे दुकान असल्याने त्याठिकाणी येणारी माणसे शौचालय खराब असल्याने रस्त्यावरच घाण करताना दिसून येत आहेत.याबाबत आज बुरुड गल्ली, कुंभार गल्ली,नागराज गल्ली,जोशी गल्ली,भागातील नागरिकांनी शिवसेनेच्यावतीने नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन लवकरात लवकर तेथील शौचालय बंद करण्याची मागणी केली आहे.
यावेळी ऊबाठा शिवसेना शहर प्रमुख विशाल शिंदे,उपशहर प्रमुख प्रमोद सावंत,कामगार सेना उप जिल्हा प्रमुख सचिन चव्हाण,महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख आश्विनी मोकळे, शहर प्रमुख छाया पाटील,सुनीता थोरात,राहुल माने,प्रमोद दरेकर, प्रदीप दरेकर,सय्यद अत्तार,अक्षय जाधव,माजी सैनिक किशोर गायकवाड,राजु भातमारे तसेच स्थानिक नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.