प्रतिष्ठा न्यूज

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये ‘भारतीय संविधान दिन साजरा’

प्रतिष्ठा न्यूज
कराड :(ता. 27, प्रतिनिधी) : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांची जोपासना करत भारतीय नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार व कर्तव्य ज्या दिवशी मिळाले तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करीत आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी त्यावेळच्या भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सुपूर्द केली. भारतीय संविधान हे सर्व जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे.”असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अँड. विद्या भिंगारदिवे यांनी केले. यावेळी अतिथी वैशाली सोनवले व स्वप्नील भिसे यांनी प्रात्यक्षिक करून संविधानाचे महत्व पटवून दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. पी. जाधव, प्रा. एस. एस. बोंगाळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाप्रसंगी जिमखाना उपाध्यक्षा डॉ. श्रीमती एस. आर.सरोदे, उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे उपस्थित होते.
प्रा.सौ. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. सौ. एम. एम. चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमास वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या जूनियर व सिनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.