प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालयात क्षेत्रभेटीचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील इयत्ता दहावी वर्गातील क्षेत्रभेट ,सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .बी.एम.हंगरगे व उप मुख्याध्यापक डॉ.पांडुरंग यमलवाड आणि पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले. सदरील क्षेत्रभेटीत औंढा नागनाथ ( हिंगोली),शंभू महादेव मंदिर दर्शन, नेमगिरी पर्वत जैन मंदिर गुंफा,गार्डन येलदरी धरण ,जिंतूर जिल्हा परभणी येथील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आली. एक दिवशीय क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी येलदरी धरण परिसरात भूगोल विषयाचे तज्ञ अध्यापक डॉ. एम. एम. गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी येलदरी धरणाची ऐतिहासिक माहिती दिली.तसेच क्षेत्रभेटीचे, सहलीचे महत्त्व सांगितले.
सहल यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक श्री रत्नाकर कोत्तापल्ले सहशिक्षिका श्रीमती सुनिता पावसे , श्रीमती कांता जायेभाये आणि श्री आर. एच.पवार यांनी सहकार्य केले. या सहलीमध्ये 79 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सदरील क्षेत्रभेट ऐतिहासिक आणि ज्ञान रंजक यशस्वी ठरली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.