प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वृंदा पाध्ये यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.३ : गगनबावडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वृंदा श्रीकृष्ण पाध्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच मानसी कांबळे उपस्थित होत्या.उपसरपंच मुस्ताक वडगावे यांचा दोन वर्षाचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गाव बांधीलकी आघाडीत ठरलेप्रमाणे वृंदा पाध्ये यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीप्रसंगी आघाडीचे नेते नंदकुमार पोवार, विश्वनाथ पोतदार यांच्या हस्ते नूतन उपसरपंच वृंदा पाध्ये व मावळते उपसरपंच मुस्ताक वडगावे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रा. प. सदस्य दिपक घाटगे, अरुण चव्हाण, संतोष गावडे, ग्रा.प.सदस्या अरुणा पोतदार, सायराबानू म्हालदार, नेहा पाटील, गणपतराव भांबूरे, धनाजी शिंदे ,रविंद्र कांबळे, अशोक नागांवकर ,संतोष पाटील, ईजाज म्हालदार, गुरूनाथ कांबळे, सुनिल भांबूरे, सचिन भांबूरे, वैदेही पाध्ये, वैष्णवी पाध्ये, ईशाद रेठरेकर आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार ग्रामसेवक दिलीप डवरी यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.