प्रतिष्ठा न्यूज

खाजगी भूखंड स्वच्छ ठेवणे मालकांची जबाबदारी – अति आयुक्त रविकांत अडसूळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालय येथे कर्मचारी अधिकारी यांची बैठक अतिरीक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उप आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
प्रामुख्याने नगररचना, आरोग्य आणि बांधकाम विभाग कडील समस्या आणि अडचणी बाबत या बैठकीत चर्चा झाली.
कुपवाड आणि लागत परिसरातील खाजगी भूखंड अस्वच्छ असलेबाबत तक्रारी येत असल्याने त्याची स्वच्छता करून घेणे त्या भूखंड मालकांची जबाबदारी आहे .त्यांनी स्वच्छता केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यक आहे .त्याकामी सबधितांना दखल घ्यावी आणि कारवाई सत्वर करून सदरचे भूखंड स्वच्छ होतील या कडे लक्ष द्यावे असे यावेळी सूचना अति आयुक्त श्री अडसूळ यांनी दिली आहे, सिगल यूज प्लस्टीक बाबत देखील कारवाई करावी असे उप आयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे,
वसुली कामी आढावा नक्की घेतला जाणार आहे, तथापि काही कर्मचारी यांनी या वर्षी चांगली वसुली केली आहे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.
अपुऱ्या सफाई कामगार यांच्या कामाचे चागले नियोजन करून स्वच्छता करून घेण्याकामी स्वच्छता निरीक्षक यांनी प्रयन्त करावे , त्यांना काम स्वरूप निश्चित करून देऊन त्यावर मुकादम मार्फत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतः लक्ष केंद्रित करावे असे यावेळी सांगितले आहे.
उपस्थिताचे स्वागत प्रज्ञावंत कांबळे यांनी केले तर आभार सिद्धांत ठोकळे यांनी मानले आहे.
सहा आयुक्त मानसिग पाटील , कलगुटगी गजानन खुळे इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.