प्रतिष्ठा न्यूज

६ एप्रिल भाजप स्थापना दिवस उत्साहात साजरा करणार : शहर जिल्हा कोअर कमिटीची बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सांगली शहर जिल्हा मंडल अध्यक्ष व मोर्चा अध्यक्ष यांच्या बैठकीत घेण्यात आला. खासदार संजयकाका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक पार पडली.
या बैठकीस खासदार संजयकाका पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर, सरचिटणीस मोहन वाटवे यांच्यासह मंडल चे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मतदार संघातील बुथनिहाय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस दि. ६ एप्रिल रोजी साजरा करण्याचे नियोजन करण्यात आहे. प्रमुख नेत्यांची कार्यालये, विभागीय कार्यालये तसेच प्रभागनिहाय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्व ठिकाणी सकाळी ९.३० ते १०.३० दरम्यान शक्ती केंद्र प्रमुखांच्या हस्ते झेंडा वंदन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, स्री शक्ती शोभा यात्रा होईल. विकसित भारत म्हणजे भाजप ही संकल्पना घराघरात पोहचवण्यासाठी कार्यकर्ते उत्साहाने कार्यरत होतील.
त्यानंतर येणाऱ्या महात्मा फुले जयंती, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती या उपक्रम व उत्सवांचे नियोजन झाले.
निवडणूकीतील बुथनिहाय कामकाजाचे नियोजन करण्यात आले. भाजप अंतर्गत विविध संघटनांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.