प्रतिष्ठा न्यूज

लोकशाही बळकट करण्यासाठी ऋषीन जोशी सायकल वरून विट्याला पोहोचले मतदान करायला : राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी केले कौतुक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मतदानाचा दिवस म्हणजे मिळालेली सुट्टी असं समजून भटकंतीचे टुकार नियोजन करणाऱ्या काही अविचारी तरुणांना एका सजग तरुणाने आज एक चपराक दिली.
सांगलीतील आर. जोशी’ज् बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख ऋषीन जोशी यांचे मूळ गाव विट्यामधील घानवड. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी त्यांनी सांगली – विटा – सांगली असा तब्बल 140 किमीचा प्रवास चक्क सायकलद्वारे करून आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्शच ठेवला आहे.
बॅडमिंटनसाठी वाहून घेतलेल्या ऋषीन जोशी यांची सांगलीत अकॅडमी आहे व गेली ६ वर्षे ते कोचिंग करतात. यावेळी बोलताना जोशी म्हणाले की, ” मतदानाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी गावी सायकलने जाऊन मतदानासोबत उत्तम आरोग्याचाही संदेश द्यावा असे मनात आले. घरच्यांच्या तसेच मित्रांच्या प्रोत्साहनाने हा उपक्रम पूर्ण केला याचा आनंद होत आहे.
भविष्यात ” स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा तसेच लोकशाहीच्या उत्तम आरोग्यासाठी मतदान करा ” असा उपक्रम राबवणारे त्यांचा यावेळी राज्य प्रवक्ते व दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी ऋषीन जोशी यांचे कौतुक केले व रस्त्यात मध्ये काय अडचणी असल्यास मला फोन करा तात्काळ सेवा दिली जाईल असे सांगितले. घानवड ग्रामस्थ तसेच सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.