प्रतिष्ठा न्यूज

ग्राहक,सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दि तासगाव अर्बन को-ऑप बँकेस 6.13 कोटी नफा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दि.तासगांव अर्बन को-ऑप बँकेस सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ६ कोटी १३ लाख इतका ढोबळ नफा झाला असून बँकेचा एकूण व्यवसाय ३९३.६४ कोटी इतका झाला आहे. बँकेचे शेअर भांडवल ४ कोटी १८ लाख असून स्वनिधी रु २२ कोटी ९७ लाख आहे.बँकेने सभासद,ठेवीदार, ग्राहक यांचा विश्वास संपादन करून चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या व्यवसाया मध्ये वाढ केलेली आहे.बँकेच्या ठेवी २४५.२७ कोटी कर्जे १४८.३७ कोटी आहेत बँकेच्या सांगली व सोलापूर जिल्ह्यात एकूण १२ शाखा असून चालू आर्थिक वर्षात बँकेने विटा,पंढरपूर व सोलापूर येथे नवीन शाखा सुरु केल्या आहेत. बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सर्व निकषांची पूर्तता केली असून सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा १.९४ कोटी झालेला आहे रिझर्व बँकेच्या नियमानुसार सीआरएआर किमान १२% ठेवणे आवश्यक असताना बँकेचा सीआरएआर १७.६१ टक्के आहे.बँकेच्या स्थापनेपासून बँकेस सतत ऑडीट वर्ग “अ” मिळालेला आहे. तसेच बँकेस निव्वळ एनपीए चे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश आले आहे.बँकेने मागील आर्थिक वर्षामध्ये सभासदांना १२% लाभांश दिला असून याही वर्षी १२% लाभांश देण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे.बँकेचे सर्व सभासद,ग्राहक,हितचिंतक यांचे सहकार्याने मा.संचालक मंडळ यांनी रु.५०० कोटीचा व्यवसाय पूर्ण करणेचे उद्दीष्ट ठेवले आहे.बँक नेहमीच तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून ATM कार्ड व QR कोड सारख्या डिजिटल सेवांचा वापर ग्राहकांनी करावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी यावेळी केले.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे,उपाध्यक्ष कुमार शेटे, संचालक सदाशिव शेटे,अरुण पाटील,विनय शेटे,अनिल कुत्ते,उदय वाटकर,धोंडीराम सावंत,रामशेठ शेटे,राजेंद्र माळी,सौरभ हिंगमिरे,तज्ञ संचालक उदय डफळापूरकर सीए, अॅड.आशिष अडगळे,संचालिका श्रीमती सविता पैलवान,सौ उमा हिंगमिरे,तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य अवधूत गडकर, रवींद्र देवधर व प्रदीप पवार यांचेसह मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी,असि.जनरल मॅनेजर विनायक मेंडगुले व नारायण सगरे उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.