प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ. ग गो जाधव महाविद्यालयात गरबा डान्स स्पर्धा उत्साहात : दहा संघाचा सहभाग; टेन स्टारने पटकवला प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पद्मश्री डॉ. ग गो जाधव महाविद्यालय व आनंदी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज गगनबावडा च्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय भव्य गरबा डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेत गगनबावडा तालुक्यातील दहा संघानी सहभाग नोंदवला . टेन स्टार या संघाने प्रथम क्रमांक व शिवन्या संघाने दुसरा क्रमांक तर मुलाच्या सीएस संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा होते.
परीक्षक म्हणून प्रा.ए एस कांबळे, प्रा. व्ही. एस. पाटील, व प्रा. मेंगाने यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पुजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई ,सचिव डॉ.विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. तर पारितोषिक वितरण व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस एस पानारी यांनी केले. आभार प्रा. डी. के . पाटील यांनी मानले.
यावेळेस प्रा. एच एस फरास, प्रा. एस एस घाडगे, प्रा. आर आर सरनोबत,सचिन बावडेकर,चंद्रशेखर भस्मे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.