प्रतिष्ठा न्यूज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज स्वातंत्र्यदिनी इगतपुरी तहसिल कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तालुक्यातील उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना तहसीलदार मा.परमेश्वर कासुळे साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा मुंढेगाव येथील शिक्षिका विमल कुमावत यांची विद्यार्थिनी वैष्णवी कल्पेश गतीर हिला वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मिळाले. याच शाळेतील वैष्णवी राजेंद्र गतीर हिला तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकाच्या भाषणाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना वैष्णवीने सर्व साक्षीने जणू मानवंदनाच दिली. टाळ्यांच्या प्रचंड गजरात सर्व उपस्थित अधिकारी, स्वातंत्र सैनिक यांनी तिचे भरभरून कौतुक केले. आणि तिला रोख बक्षिसे देऊन सेल्फी काढली. तिच्या भाषणाने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. प्रत्येकाला तिच्या भाषणाचा व्हिडीओ काढण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेतांना विद्यार्थिनी समवेत तहसीलदार परमेश्वर कासुळे साहेब, नायब तहसीलदार, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत, रेखा शेवाळे मॅडम,ग्राम पंचायत सदस्या सौ.गतीर, वैष्णवीचे वडील कल्पेश गतीर, आई लक्ष्मीबाई गतीर , पुंजाराम हिरे सर, जनार्दन कडवे, माणिक भालेराव, सिद्धार्थ सपकाळे, देविदास शिंदे आदी उपस्थित होते. वैष्णवीच्या या यशाबद्दल तिचे गटशिक्षणाधिकारी मा.निलेशजी पाटील साहेब,विस्तार अधिकारी राजेंद्र नेरे साहेब,केंद्रप्रमुख राजेंद्र मोरकर,मुख्याध्यापक श्री.भगवान पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती विमल कुमावत तसेच रेखा शेवाळे व शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.