प्रतिष्ठा न्यूज

महापालिकेत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने यांच्या उपस्थितीत आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते मनपा मुख्यालय आवारात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपाचे स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सब फायर ऑफिसर सुनील माळी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून संचलन करण्यात आले तर महापालिका कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी झेंडा गीत आणि समूव्ह गीत सादर केली. या कार्यक्रमासाठी महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.