प्रतिष्ठा न्यूज

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नांनी अखेर कांपा- चिमूर-वरोरा रेल्वे मार्गास कॅबिनेट मध्ये मान्यता

प्रतिष्ठा न्यूज /योगेश अगडे
चंद्रपूर : चिमूर क्रांतीकारी व ऐतिहासिक शहरात रेल्वे ची मागणी प्रलंबित होती. आज पर्यत च्या एकाही कांग्रेस च्या लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले नाही . परंतु चिमूर चे भूमिपुत्र आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी मात्र रेल्वे च्या प्रलंबित मागणीस जोरदार प्रयत्न करीत अखेर महाविकास आघाडी सरकार परिवर्तन होताच शिंदे फडणवीस भाजप सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत कांपा चिमूर वरोरा रेल्वे मार्गास मान्यता दिली गेली असल्याने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या दिल्या शब्दास पूर्ण करण्याच्या विचारधारेस अखेर यश आले आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टी तालुका चिमूर च्या वतीने तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला.
राज्याच्या मंत्रिमंडळ च्या कॅबिनेट मध्ये नागपूर उमरेड नागभीड ब्रॅंडगेज या कामात कांपा चिमूर वरोरा ब्रांडगेज रेल्वे मार्ग समाविष्ट करण्यास तत्वतः मान्यता मिळाली असून १५१८ कोटी चा प्रकल्प असून या पैकी अर्धा हिस्सा ७५९ कोटी केंद्र सरकार कडून प्राप्त करण्यासाठी मागणी करणार आहे.
यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, अल्पसंख्याक आघाडी प्रदेश महामंत्री जुनेद खान, माजी सभापती प्रकाश वाकडे, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, युवा नेते समीर राचलवार माजी नगरसेवक सतीश जाधव ,भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी वनकर ,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई ननावरे, सौ गीता लिंगायत, पवन निखाडे, अरुण लोहकरे, विवेक कापसे, पराग अंबादे, संदीप पिसे, संजय खाटीक ,सुरज नरुले, जयंत गौरकर, रमेश कंचर्लावार, कैलास धनोरे , अविनाश बारोकार, अनिल शेंडे, सावन गाडगे, भूषण डाहूले ,निखिल भुते, आशु झिरे शुभम भोपे, विकी कोरेकर, नैनेश पटेल आदि उपस्थित होते. सर्वांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे अभिनंदन केले.
दरम्यान चिमूर शहर सह तालुक्यात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.