प्रतिष्ठा न्यूज

स्व. विनायकराव मेटे यांना राजर्षी शाहू विद्यालय, ज्यु. काॅलेजच्या वतीने श्रद्धांजली

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.15 : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय, ज्युनियर काॅलेज, कस्तुरबा गांधी विद्यालय, राजर्षी शाहू बालक मंदिर च्या वतीने कै. विनायकराव मेटे यांना दि.15 आॅगस्ट रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील, लाठी गावाचे जावाई होते. मराठवाडा शिक्षण संस्थेचे संचालक आनंदराव लाठकर यांचे जावाई होते. माजी आमदार कै. विनायकराव मेटे यांचे मुंबई ला बैठकीला जात असताना अपघाती निधन झाले. ते गेल्या 27 वर्षापासून गोर, गरीब, कामगार, शेतकरी वर्ग, यांच्या अनेक समस्या साठी लढा देत होते. मराठा आरक्षणासाठी विधानसभा, विधान परिषदेत त्यांनी अनेक वेळा प्रश्न मांडला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून एका सामाजिक, राजकीय लढवय्या नेतृत्वास पोरके झालो आहोत.
राजर्षी शाहू विद्यालयात त्यांना साश्रू नयनांनी विद्यार्थ्यी, शिक्षक बंधू, भगिनी यांच्या वतीने एक मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संचालक श्री चंद्रशेखर सोनवणे, प्राचार्य श्री बालाजी हंगरगे, उपप्राचार्य डॉ.पांडुरंग यमलवाड, पर्यवेक्षक पंजाबराव सावंत, प्रा. आर. डी. देशमुख, मु. अ.श्री बी. डी. देशमुख, अमोल भंगाळे, आनंद मोरे, नागनाथ केंद्रे, वसंतराव भोसले, श्री सोनाजी वाडेकर, श्री टी.एन. रामनबैनवाड, किशन जायेभाये, पंढरीनाथ मुसळे, श्री विठ्ठल पोकलेवाड, डॉ माणिक गाडेकर, राजेश कदम, शिवानंद टापरे, बालाजी गर्जे, श्री संतोष बिरादार, श्री बालासाहेब माने, श्री गोपाळ मोरे, श्री वैजनाथ आर्दड, श्री आर. आर. महालिंगे, श्री वाघमारे, श्री धनाजी बस्वदे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.