प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

हुजूर साहिब नांदेड- पनवेल- नांदेड दिवाळी विशेष गाड्यांच्या चार फे-या

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : प्रवाशांची मागणी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने नांदेड ते पनवेल दरम्यान दिवाळी विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे.

नांदेड-पनवेल विशेष गाडी :
गाडी क्रमांक ०७६१५ नांदेड ते पनवेल विशेष गाडी नांदेड येथून दिनांक १० आणि १७ नोव्हेंबर, २०२३ ला रात्री वाजता सुटेल आणि २३.०० पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल.

पनवेल-नांदेड विशेष गाडी गाडी क्रमांक ०७६१६ पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल येथून दिनांक ११ आणि १८ नोव्हेंबर, २०२३ ला दुपारी १३.२० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ०४.०० वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे एकूण २० डब्बे असतील.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.