प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुका सकल मराठा समाजाची निवडे फाटा येथे निषेध रॅली ; दोषींचे निलंबन करावे

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील आंदोलकावर अमानुष लाठी हल्ला केला व आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्या प्रित्यर्थ आज सकाळी अकरा वाजता निषेध रॅली नंतर निवडे फाटा येथे सभा झाली.
आज अखेर मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले हे सर्व शांततेत झाले,( ज्याची नोंद गिनीज बुकात झाली)
हेही आंदोलन शांततेतंच चालू होते. म्हणून ताबडतोब दोषींचे निलंबन करावे, असे  प्रशासनास निवेदनही देण्यात आले.
सरकारने यातून मार्ग त्वरित न काढलेस गगनबावडा सकल मराठा समाज बेमुदत उपोषणास बसणार असून त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहील. असे तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप पाटील, निवृत्ती माळुंगेकर, शिवाजी राऊत आदिने आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी हजारो तालुका वाशीय हजर होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.