प्रतिष्ठा न्यूज

वनराई व मुकुंद भवन ट्रस्ट मार्फत खंडाळा तालुक्यातील शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज
खंडाळा : वनराई व मुकुंद भवन ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा तालुक्यातील १६ शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्यात आले. दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या या लोकापर्ण सोहळ्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. खंडाळा तालुक्यातील मोकाशे वस्ती, कराडवाडी, शिवाजीनगर, भादे , माव्हशी, वडगांव, शेखमिरवडी इ. १६ शाळांचा समावेश यात आहे. या उपक्रमाचा लाभ एकूण ४००० विद्यार्थ्यांना होत आहे. यावेळी ऋषिकेश धायगुडे यांनी, ” मुकुंद भवन ट्रस्ट आणि वनराई यांचा हा एक उत्कृष्ट उपक्रम असल्याचे सांगून, यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागणार आहे.” असे प्रतिपादन केले. मोर्वेच्या सरपंच अंजली धायगुडे यांनी शाळेला दिलेल्या मदतीबद्दल वनराई आणि मुकुंद भवन ट्रस्टचे आभार मानले. यावेळी वनराई आणि मुकुंद भवन ट्रस्टच्या वतीने आकाश शेडगे, रमेश डोंबाळे, अली बेग, वैभव चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते. याचबरोबर मोकाशे वस्तीचे सर्व ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.