प्रतिष्ठा न्यूज

निशा कदम हिचे स्पर्धा परीक्षेत यश

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : सांगशी (ता.गगनबावडा) येथील कु. निशा दीपक कदम हिने बँक ऑफ इंडिया च्या आय बी पी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले असून तिची क्लार्क या पदासाठी निवड झाली आहे.
निशा हिचे माध्यमिक शिक्षण सांगशी येथील माध्यमिक विद्यालयात झाले असून पुढे अकरावी बारावीचे शिक्षण  कमला कॉलेज कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर न्यू कॉलेज येथे बीएससी पूर्ण केले.
सध्या शेळोशी येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे बँक मॅनेजर या पदावर कार्यरत असलेले दीपक हरिश्चंद्र कदम यांची ती कन्या आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील निशाचे  तिच्या यशाबद्दल  सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.